घरमहाराष्ट्रनाशिकइगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक सारेच संभ्रमात

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक सारेच संभ्रमात

Subscribe

नाशिक : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदार संघ हा गेल्या चार पाच पंचवार्षिकपासून काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यामुळे विधानसभेला हा मतदार संघ काँग्रेस व राष्ट्रवादीला कौल देत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र आता झालेल्या राजकीय भूकंपामुळे राज्यापासून तालुक्यातील देखील राजकीय समीकरणे बदलली आहेत. नेत्यांसोबत जनता देखील संभ्रमात असुन त्यामुळे कोणता झेंडा घेऊ हाती अशी म्हणायची वेळ आली आहे.

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदार संघात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून राज्यातील सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. आणि त्याचा परिणाम स्थानिक राजकारणावर होताना दिसत आहे. मात्र इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात पहिल्यापासूनच संमिश्र राजकारण बघायला मिळत आहे. आणि आता राज्यात संमिश्र राजकारण झाल्यामुळे मतदार संघात राजकारण बदलणार आहे एवढं मात्र नक्की झाले आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात आमदार काँग्रेसचा आहे. तर जिल्हा परिषद पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा आहे.

- Advertisement -

मात्र आता चित्र बदलले असून गेल्या वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारात सरकारमध्ये आपले वर्चस्व दाखवून दिले होते. मात्र आता अजितदादा पवार यांनी आपली ताकद स्पष्ट केली आहे. त्यामुळे शिवसेने बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले आहे. त्यामुळे तालुक्यात कोण कोणत्या गटाकडे आहे हे बघणे महत्वाचे ठरणार असून शिंदे गट शिवसेनेकडे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ व माजी आमदार पांडुरंग गांगड हे आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे माजी आमदार शिवराम झोले असुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे माजी आमदार निर्मला गावित या आहेत.

कोण आहेत २०२४ विधानसभेसाठी इच्छूक

२०१९ मध्ये इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदार संघात आमदार हिरामण खोसकर यांनी बाजी मारली होती. आता २०२४ साठी राजकीय समीकरणे बदललेली आहेत. गेल्या वर्षभरापूर्वी शिंदे गट शिवसेना म्हणून प्रचलित झाला असुन त्याच अनुषंगावर माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आजमितीस काशिनाथ मेंगाळ हे शिंदे गटात आहेत. त्यामुळे भाजप, शिंदे गट व अजितदादा गट एक झाल्यास इगतपुरी मतदार संघात बदल नकीच होईल अशी चर्चा आहे. दरम्यान मेंगाळ यांच्यामागे समाजाची वोट बँक देखील मजबुत आहे. तर राष्ट्रवादीकडे माजी आमदार शिवराम झोले आहेत. शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडे माजी आमदार निर्मला गावित आहेत. मात्र काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाची युती झाली तर उमेदवार कोण हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -