घरमहाराष्ट्रकशेळे-गणेश घाट रस्त्याची दयनीय स्थिती

कशेळे-गणेश घाट रस्त्याची दयनीय स्थिती

Subscribe

स्थानिक ठेकेदारांचे निकृष्ट काम

तालुक्यातील खांडस भागातील कशेळे-नांदगाव फाटा-गणेशघाट रस्त्याच्या कामावर मोठ्या प्रमाणात खर्च गेल्या काही वर्षांत झाला आहे. मात्र रस्त्यावर काम करणार्‍या स्थानिक ठेकेदारांनी रस्त्याची स्थिती दयनीय केली आहे. सध्या रस्त्याच्या दोन भागात 7 कोटी रुपये खर्चून मजबुतीकरणाचे काम सुरू आहे, मात्र अत्यंत नित्कृष्ट दर्जाची कामे सुरू असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत.

खांडस भागातील कशेळे-नांदगाव फाटा-गणेशघाट या रस्त्याचे मजबुतीकरण केले जात आहे. या रस्त्यावर दोन टप्प्यात तब्बल 7 कोटी रुपये खर्चून रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण यांची कामे मंजूर आहेत. त्या भागातील मार्गाचीवाडी ते नांदगाव फाटा या रस्त्यावर दोन्ही बाजूला साईडपट्टी वाढविण्याचे आणि त्यावर खडीकरण, डांबरीकरण अशी कामे मंजूर आहेत. तर नांदगाव फाट्यापासून खांडस गावातून गणेशघाट या रस्त्यावर देखील मजबुतीकरणाचे काम मंजूर आहे. मात्र मार्गाची वाडीपासून कशेळे पर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण 2017 मध्ये करण्यासाठी निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्या होत्या.

- Advertisement -

त्यावेळी ज्या भागात रस्त्याचे मजबुतीकरण कामे करण्यात आली त्या ठिकाणी काम करणार्‍या ठेकेदारांनी खडीकरण केल्यानंतर कार्पेट डांबरीकरण केले नव्हते हे जागोजागी आजही दिसून येत आहे. असे असताना तेच ठेकेदार मार्गाचीवाडीपासून खांडस गणेश घाटपर्यंतच्या रस्त्याची मजबुतीकरणाची कामे करीत आहेत. स्थानिक ठेकेदार पुन्हा आपली राजकीय ताकद वापरून रस्त्याची कामे करीत असल्याने अत्यंत खराब कामे होत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत.

काम करताना साधे पाणीही मारले जात नाही. दुसरीकडे डांबर शिंपून केलेले खडीकरण लगेच बाहेर पडले असून काम करणारे स्थानिक ठेकेदार हे कोणालाही जुमानत नाहीत.त्यामुळे रस्त्याची लवकर दुरवस्था होणार हे नक्की आहे. त्याचवेळी तब्बल 7 कोटी रुपयांचा चुराडा होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -