घरमुंबईभुईगावच्या आदिवासी पाड्यावर तबेल्यांचे अतिक्रमण

भुईगावच्या आदिवासी पाड्यावर तबेल्यांचे अतिक्रमण

Subscribe

आदिवासी एकता परिषदेची आयुक्तांकडे तक्रार

भुईगावच्या आदिवासी पाड्यातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून तबेले उभारण्यात आले असून, या तबेल्यामुळे रोगराई पसरल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी एकता परिषदेने आयुक्तांकडे केली आहे.
मोरीआळी या आदिवासी पाड्यातील सरकारी खाजण जमिनीवर पंधरा दिवसांपूर्वी अनधिकृत तबेले उभारण्यात आले आहेत. हे तबेले दिसू नये यासाठी त्याच्याभोवती निळ्या रंगाचे प्लास्टिकचे कव्हर गुंडाळण्यात आले आहे. या तबेल्यातील शेण पाड्याच्या शेजारी टाकले जात असल्यामुळे दुर्गंधी पसरून डासांचा उपद्रव वाढला आहे. तबेल्यातील म्हशींसाठी पत्र्याच्या शेडमध्ये सुके गवत ठेवण्यात आले असून, या गवताला आग लागल्यास संपूर्ण पाडा जळून खाक होण्याची भीती आदिवासी एकता परिषदेने महापालिका आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -