घरBudget 2024Maha Politics : प्रकाश आंबेडकरांची जागा वाटप फॉर्म्यूल्याची नवी अट; शिवसेनेला अधिक...

Maha Politics : प्रकाश आंबेडकरांची जागा वाटप फॉर्म्यूल्याची नवी अट; शिवसेनेला अधिक तोटा

Subscribe

मुंबई – वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत केव्हा समावेश होणार, या प्रश्नाचे उत्तर अखेर शुक्रवारी मिळाले. प्रकाश आंबेडकर जातीने महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिले. आंबेडकरांच्या समावेशाने महाविकास आघाडी आता मजबूत होणार अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र प्रकाश आंबेडकरांनी आघाडीसोबत राहण्यासाठी एक अट ठेवली आहे. निश्चितच ती लोकसभा जागावाटपासंबंधीची अट आहे. प्रकाश आंबेडकरांच्या येण्याने आघाडीचे नेते सुखावले असले तरी त्यांच्या अटीने अनेकांना दुःखही होत आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केव्हा होणार, याची महाराष्ट्रात अनेकांना उत्सूकता होती. अखेर शुक्रवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर स्वतः उपस्थित राहिले आणि या चर्चेला पूर्ण विराम मिळाला. महाविकास आघाडीची लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असताना प्रकाश आंबेडकरांची झालेली एंट्री, ही आघाडीत नवे ट्विस्ट निर्माण करणारी ठरत आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीतील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबतच्या बैठकीनंतर माध्यमांसमोर येऊन प्रकाश आंबेडकरांनी भलेही महाविकास आघाडीची इंडिया होऊ देणार नाही असे सांगितले असले तरी बैठकीत त्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्यूला नव्याने निश्चित करण्याची अट ठेवली आहे. वंचितला किती जागा हव्या आहेत, हे त्यांनी जाहीर केले नाही. बैठकीनंतर सार्वजनिकरित्या सांगितले नाही. पण बैठकीत त्यांनी वंचितला हव्या असलेल्या जागांची सविस्तर माहिती दिली आहे. अकोल्याची एकमेव लोकसभेची जागा लढवण्यावर वंचित समाधानी नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : Jitendra Awhad : गुन्हेगारांना राजाश्रय कोण देतंय? जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर निशाणा

- Advertisement -

प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत सामील करुन घेण्याआधीच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्यूला जवळपास निश्चित झालेला होता. 35 ते 40 जागांवरील चर्चा पूर्ण झालेली होती. उर्वरित आठ जागा या आघाडीतील मित्र पक्षांना देण्याचेही जवळपास निश्चित झाले होते. सर्वाधिक जागा या शिवसेना ठाकरे गट आणि त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी रचना झालेली आहे. प्रकाश आंबेडकरांना अकोल्यासह अमरावती, परभणी, आणि बुलढाणा या तीन जागा हव्या असल्याची चर्चा आहे. यातील परभणी आणि बुलढाणा या दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत. यातील परभणीचे खासदार हे अजुनही ठाकरेंसोबतच आहेत. आंबेडकरांनी मागणी केलेल्या सर्वाधिक जागा या शिवसेनेकडील आहेत. त्यामुळे अडचण ही शिवसेनेची होणार आहे. नव्या जागा वाटप फॉर्म्यूल्यावर महाविकास आघाडीला पुढील 15 दिवसांत भूमिका घेण्याची मुदत आंबेडकरांनी दिली आहे.

हेही वाचा : Maha Politics : मविआची ‘इंडिया’ होऊ देणार नाही; पहिल्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांचे सूचक वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -