घरमहाराष्ट्रPrakash Ambedkar : "आम्ही स्वतंत्र लढलो तर..."; जागावाटपाच्या चर्चेदरम्यान पुन्हा नाराजीचा सूर

Prakash Ambedkar : “आम्ही स्वतंत्र लढलो तर…”; जागावाटपाच्या चर्चेदरम्यान पुन्हा नाराजीचा सूर

Subscribe

नागपूर : सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. गुरुवारी (29 फेब्रुवारी) महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे उपस्थित होते. मात्र यानंतर आज त्यांनी आम्ही स्वतंत्र लढलो तर किमान 6 लोकसभेच्या जागा जिंकू शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे. नागपूर येथील रवी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Prakash Ambedkar We will win at least 6 Lok Sabha seats as long as we fight independently Again the tone of displeasure during the seat sharing discussion)

हेही वाचा – Maharashtra Budget Session : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, मुख्यमंत्र्यांची घोषणा

- Advertisement -

पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सध्या महाविकास आघाडीत जागा वाटपावरून काँग्रेस व उद्धव ठाकरे गटात घमासामान सुरू आहे. आधी त्यांची चर्चा होते व नंतर ते आम्हाला बोलावतात. या चर्चेत सध्या आम्ही उपरे आहेत. त्यामुळे आम्ही राज्यभर 10 मार्चपर्यंत 42 मतदारसंघात वंचितच्या जाहीर सभा घेतल्या आहेत. त्यामध्ये आमच्या विचारांचे लोक किती आहेत हे दिसून आले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही सभेत आम्ही जेवण देत नाही, गाड्या देत नाही. मात्र, तरीदेखील स्वतःच्या पैशाने सभेला येणारा माणूस येतो, स्वतःची शिदोरी घेऊन येतो. त्यामुळे आमच्याकडील गर्दी पाहता आम्ही स्वतंत्र लढलो तर किमान लोकसभेच्या 6 जागा जिंकू, असा आमचा विश्वास असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा – Politics : पवारांच्या निमंत्रणाला शिंदे, फडणवीसांचा नकार; बारामतीतील स्नेहभोजन टाळले!

- Advertisement -

आम्ही लोकसभेच्या 48 पैकी सगळ्या जागांवर ताकदीने लढू शकतो, 48 पैकी 2 जागा जर सोडल्या, तर अडीच लाखांच्यावर आमची ताकद आहे, असे वक्तव्य करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर निशाणा साधला त्यांनी म्हटले की, हे सरकार आरएसएसचे आहे. हे भौगोलिक आणि राष्ट्रीय सीमा मानत नाहीत. म्हणून ते सांस्कृतिक सीमांची चर्चा करतात. त्यामुळे या सांस्कृतीक सीमा विस्तारीत करण्यासाठी भारताला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा डाव चाललाय का? हे इथल्या विचारवंतांनी तपासलं पाहिजे. निवडणुकीपूर्वी हा विषय लोकांसमोर मांडण्याची आवश्यकता असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -