घरमहाराष्ट्रदिव्यांग मुलीवर शिपायाने केला अत्याचार

दिव्यांग मुलीवर शिपायाने केला अत्याचार

Subscribe

नाशिकमधील सातपूर येथील 'नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड' या वसतिगृहातील एका शिपायाने दिव्यांग तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित तरुणाला फाशी द्यावी अशी करण्यात आली आहे.

नाशिक येथील ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ वसतिगृहातील एका दिव्यांग मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. बाळू धनवटे असे या संशयिताचे नाव असून हा वसतिगृहातील शिपाई या पदावर कार्यरत आहे. या संशयित आरोपीला फाशी द्या, अशी मागणी शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना निवेदन देण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

नाशिक मधील सातपूर येथील ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ या वसतिगृहातील १५ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली. याप्रकरणी चौकशी केली असता वसतिगृहातील शिपाई बाळू धनवटे यांनी जुलै २०१८ रोजी या तरुणीवर अत्याचार केल्याचे समोर आले. पीडितीने त्याला प्रतिकार केला असता तरुणीला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. त्यामुळे घाबरलेली तरुणी काहीच बोली नाही. त्यानंतर तरुणी औरंगाबाद येथील आपल्या गावी निघून गेली. सुटीवरुन परत आल्यानंतर पुन्हा तिच्यावर शिपायाने अत्याचार केला. मात्र या नराधम शिपाला अद्याप कामावरुन निलंबित करण्यात आले नसून या निष्पाप मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिपायास संस्थेतून कायमस्वरुपी निलंबित करण्यात यावे. तसेच यापुढील काळात मुलींच्या वसतीगृहात महिला शिपाई आणि महिला रेक्टरचीच नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

वाचा – गरबा खेळणार्‍या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

वाचा – मजुराच्या कुटुंबातील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -