घरमहाराष्ट्रआरक्षणाच्या मागणीवरुन पुण्यात मुस्लिम समाज रस्त्यावर 

आरक्षणाच्या मागणीवरुन पुण्यात मुस्लिम समाज रस्त्यावर 

Subscribe

आरक्षणाच्या मागणीवरुन आता मराठा समाजा पाठोपाठ मुस्लिम समाज पुण्यात रस्त्यावर उतरला आहे. राज्यभरातील मुस्लिम समाज आरक्षणाच्या मागणीवरुन पुण्यात एकवटला आहे.

मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरामध्ये आंदोलन केली. त्यापाठोपाठ आता आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज रविवारी रस्त्यावर उतरला आहे. आरक्षणाच्या प्रमुख मागणीसोबतच इतर मागण्यांसाठी पुण्यात मुस्लिम समाजाने मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला मोठ्या संख्येने मुस्लिम समाज सहभागी झाला आहे. राज्यभरातील मुस्लिम समाज आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात एकवटला आहे. लहान मुलांपासून ते अगदी वयोवृध्द देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत.

- Advertisement -

विभागिय आयुक्त कार्यालयासमोर होणार सांगता

पुण्याच्या गोळीबार मैदानातून सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये महिलांचा मोठ्याप्रमाणात सहभाग आहे. मोर्चाचे नेतृत्व मुली करत असून, त्यानंतर महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुणानंतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते आहेत. गोळीबार मैदानातून निघालेल्या या मोर्चाची सांगता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर होणार आहे. गोळीबार मैदान ते काउन्सिल हॉल या मार्गे हा मोर्चा काढला गेला. गोळीबार मैदान येथून रामोशी गेट, संत कबीर चौक, डॉ. आंबेडकर भवन, ससून हॉस्पिटल, डॉ. आंबेडकर पुतळा, साधू वासवानी पुतळा ते काउन्सिल हॉल असा मोर्चाचा मार्ग आहे.

काय आहेत मुस्लिम समाजाच्या मागण्या?

– मुस्लिम समाजाला दिलेले ५ टक्के आरक्षण कायम करावे

- Advertisement -

– मॉबलिचिंगच्या घटना थांबल्या पाहिजे

– मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डातील सरकारी हस्तक्षेप थांबला पाहिजे

– वक्फ बोर्ड जमिनीवरील अतिक्रमण हटवा

– मुस्लिमांना अट्रोसिटी कायद्याअंतर्गत सुरक्षा द्या

– दलित मुस्लिमांवरील आत्याचाऱ्याच्या घटना रोखाव्यात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -