घरमहाराष्ट्रभामा-आसखेड धरणात शेतकऱ्याची जलसमाधी; मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबाचा नकार

भामा-आसखेड धरणात शेतकऱ्याची जलसमाधी; मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबाचा नकार

Subscribe

भामा आसखेड धरणग्रस्तांचे पुर्नवसन न केल्याने निराश झालेल्या एका तरूणाने आत्महत्या केली.

आपल्या हक्काची लढाई लढत असताना भामा-आसखेड धरण ग्रस्त शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलून धरणपात्रात काल (शनिवारी) सकाळी जलसमाधी घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रौंधळवाडी गावातील रहिवासी ज्ञानेश्वर शांताराम गुंजाळ (वय ३५) असे जलसमाधी घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जलसमाधी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. मयत ज्ञानेश्वर शांताराम गुंजाळ यांचे पुनर्वसन करा तरच मृतदेह ताब्यात घेऊ असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

शासकिय पातळीवरुन दिलेला शब्द पाळला जात नाही आणि तारीख पे तारीख करत पुनर्वसनासाठी चालढकल होत असल्याने एक महिन्यांपासून जँकवेलचे प्रकल्पग्रस्तांनी काम बंद केले. मात्र शासनाने पोलीस बंदोबस्त लावून जॅकवेलचे काम सुरु केले. आमच्या हक्काच्या पुनर्वसनासाठी चालढकल केली जात असल्यामुळे धरणात सामूहिक जलसमाधी घेऊ, असा इशारा भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांनी दिला होता.

- Advertisement -

आमचे पुनर्वसन केल्याशिवाय आम्ही जॅकवेल आणि पुण्याला जाणाऱ्या जलवाहिनीचे काम चालू करू देणार नाही असे स्पष्ट करत प्रकल्पग्रस्तांनी निर्णयावर आम्ही ठाम असल्याचे सांगितले होते. फसवी आश्वासने खूप झाली. आता पुनर्वसनाची ठोस कारवाई करा. प्रकल्पग्रस्तांचे आधी पुनर्वसन करा आणि मग पाणी पुण्याला द्या, अशी भूमिका प्रकल्पग्रस्त शेतकरी वारंवार घेत होते. मात्र शासनपातळीवर योग्य दखल न घेतल्यानेच शेतकरी आक्रमक झाले आणि त्यातून काल एका शेतकऱ्याने जलसमाधी घेतली आहे.

भामा – आसखेड पुनर्वसन

३० वर्षापूर्वी भामा-आसखेड हे धरण भामानदीच्या भामा खोऱ्यात तयार करण्यात आले. शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी या पाण्याचा उपयोग करण्यात येणार होता. या धरणक्षेत्रात अनेक गावे उठविण्यात आली. मात्र आजपर्यंत धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन अद्यापही झालेले नाही. त्यासाठी अनेक आंदोलनेही झाली. मात्र प्रश्न मार्गी लागला नाही. हि लढाई आता जलसमाधीवर येऊन ठेपली आहे

- Advertisement -

पाण्याचे जलपुजन आणि मग जलसमाधी

सध्या पावसाचे दिवस आहेत, चार दिवसांपूर्वी भामा-आसखेड धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. आमदार सुरेश गोरे यांनी पाण्याचे जलपूजन केले होते. त्याच पाण्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने जलसमाधी घेऊन आत्महत्या केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासुन पुनर्वसनाची जमिन मिळत नाही आणि त्यातून कर्जाचा डोंगर उभा राहिला. यावरूनच कुटुंबात निराशा होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. – गुंजाळ यांच्या पत्नी प्रतिभा गुंजाळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -