घरमहाराष्ट्रपुण्यात काश्मिरी महिलेचा विनयभंग; अवघ्या ३६ तासांत न्यायालयाने दोषींना सुनावली शिक्षा

पुण्यात काश्मिरी महिलेचा विनयभंग; अवघ्या ३६ तासांत न्यायालयाने दोषींना सुनावली शिक्षा

Subscribe

पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एका काश्मिरी महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मात्र अवघ्या ३६ तासांत न्यायालयाने गुन्हेगाराला शिक्षा सुनावली आणि पीडितेला न्याय मिळवून दिला आहे. न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे आत्ता सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० डिसेंबर २०२१ रोजी दुपारी तक्रारदार पीडित महिला घरात एकटी होती. यावेळी घरात एकटी असल्याचा फायदा घेत एका व्यक्तीने तिचा विनयभंग केला. यानंतर पीडितेने नजीकच्या चिंचवड पोलीस ठाण्यात जाऊन नराधमाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी मोरया हाउसिंग सोसायटीत राहणाऱ्या २२ वर्षीय सुरेशकुमार मोहनलाल याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले.

- Advertisement -

तक्रारदार महिलेनकडून त्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या गुन्हेगाराविरोधात दोषारोप पत्र दाखल करत त्याला पिंपरी चिंचवड न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकील साधना बोरकर यांनी न्यायालयात पीडितेच्या बाजूने युक्तिवाद केला.

याचवेळी चिंचवड पोलिसांनीही या प्रकरणातील आरोपीविरोधातील सर्व पुरावे आणि साक्षीदार न्यायालयात सादर केले, सर्व वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपीला बाजू मांडण्याची संधी दिली. तर बचाव पक्षाच्या वकिलाने त्यांच्या अशिलाची बाजू घेतली. त्यानंतर न्यायालयाने सर्व गोष्टींचा विचार करत निकाल दिला. अवघ्या काही तासांत एखाद्या गुन्हेगारास शिक्षा सुनावल्याने न्यायालयाचा हा निकाल ऐतिहासिक निकाल ठरला आहे.

- Advertisement -

या प्रकरणी न्यायालयाने मुख्य गुन्हेगार मोहनलाल याला ५ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर अवघ्या ३६ तासांत हा निर्णय न्यायालयाने दिला. मात्र चिंचवड पोलीसांची भूमिका यात महत्त्वाची ठरली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -