घरताज्या घडामोडीदेशात हिंदू व्होट बँकेचा पहिला विचार बाळासाहेब ठाकरेंनी मांडला, राऊतांचे चंद्रकांत पाटलांना...

देशात हिंदू व्होट बँकेचा पहिला विचार बाळासाहेब ठाकरेंनी मांडला, राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदू व्होट बँक तयार केली त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कळस चढवला असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. मात्र देशात हिंदू व्होट बँकेचा पहिला विचार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला आणि हिंदू म्हणून निवडणूकही लढवली होती असे प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. बाळासाहेबांनी हिंदू म्हणून निवडणूक लढवली तेव्हा कोणाच्या मनात हा विचार आला नव्हता. तरीही व्होट बँकचे राजकारण कोणाला करायचे असेल तर त्यांनी इतिहासाची पाने चाळली पाहिजे असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील काय म्हणतात यावर भूमिका ठरत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदू व्होट बँक तयार केली का? हे मला माहिती नाही परंतु त्यांनी या महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यापुर्वी वीर सावरकर यांनी या देशात रुजवला, बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू ह्रदयसम्राट ही उपाधी या देशातील जनतेनं दिली असल्याचे राऊत म्हणाले.

- Advertisement -

बाळासाहेबांनी हिंदूंना हिंदू म्हणून मत द्यायला लावले

बाळासाहेब ठाकरे या देशातील एकमेव नेते आहेत. भाजपच्या नेत्यांचे विधान ऑनरेकॉर्ड आहेत. प्रमोद महाजन म्हणालेत की, बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले मी ज्या प्रमाणे मराठी माणसाला मराठी माणूस म्हणून मत द्यायला लावले त्याप्रमाणेच या देशातील हिंदूंना हिंदू म्हणून मत द्यायला लावेल आणि बाळासाहेबांनी ते १९९२ नंतर करुन दाखवले असे संजय राऊत यांनी सांगितले.

हिंदू म्हणून मत मागितल्यामुळे आमदार निलंबित

पार्ल्याच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना प्रथम हिंदूत्वाच्या मुद्द्यावर लढली. तेव्हा कोणाच्याही मनात विचार आला नव्हता की, हिंदू म्हणून आपण निवडणूक लढायला हवी आणि हिंदूत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या त्या आमदारांचे निलंबन झाले. कारण हिंदूत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना लढली आणि हिंदु म्हणून मत मागितली त्यामुळे शिवसेनेचे आमदार रमेश प्रभू आणि दुसरे सुर्यकांत महाडिक यांना निलंबित करण्यात आले असल्याचे राऊतांनी सांगितले.

- Advertisement -

हिंदू व्होट बँकबाबत पहिला विचार बाळासाहेबांचा

दरम्यान संजय राऊत पुढे म्हणाले की, मला असं वाटत नाही की देशात भाजपच्या कोणत्या खासदार आमदाराला हिंदू व्होट बँकमुळे निवडणूक गमवावी लागली. आम्ही लढलो आणि जिंकलो बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंना हिंदू म्हणून मत द्यायला लावले. या देशात हिंदूंची व्होट बँक आहे. हा पहिला विचार या देशात बाळासाहेब ठाकरेंनी मांडला आहे. कोणी कोणत्या भ्रमात आहे ते मला माहिती नाही. पण या देशाची जनता बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान कधीही विसरणार नाहीत.

बाबरीचे पतन होताना सध्याचे हिंदू पळून गेले

अयोध्येत बाबरीचे पतन होत असताना सगळे पळून गेले शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिले. ते म्हणाले हो आम्ही हिंदू आहोत. बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा आम्हाला अभिमान असल्याचे संजय राऊत म्हणाले.

आमचे हिंदूत्व शेपूट घालं नाही

आमचे हिंदूत्व पळपूट आणि शेपूटघालं नाही. आम्ही ठामपणे उभे राहतो आणि लढतो विजय प्राप्त करतो. आमचं हिंदूत्व फक्त राजकारणासाठी आणि निवडणुकांच्या सोयीसाठी तसेच मंदिरांसाठी नाही. आमचे हिंदूत्व लोकांना अन्न, वस्त्र, निवारा रोजगार मिळावा यासंदर्भात जोडलं गेलं आहे. पण ठीक आहे काही लोकांनी व्याख्या बदल्या असतील. व्होट बँकचे राजकारण कोणाला करायचे ते करु द्या पण त्यांनी इतिहासाची पाने चाळली पाहिजेत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर असलेली पाने पुसता येणार नाहीत असे संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा :  रेशनवर मिळणार वाईन? लीटरमागे १० रुपये कर आकारण्याचा राज्य सरकारचा निर्णय


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -