घरमहाराष्ट्रकोरेगाव-भिमामध्ये सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्याची नजर

कोरेगाव-भिमामध्ये सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्याची नजर

Subscribe

पुणे जिल्ह्यात थंडीची मोठी लाट पसरली असतानाही विजयस्तंभ शौर्यदिनासाठी देशभरात विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी अनुयायांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे.

कोरेगाव-भिमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. या अनुयायांना कुठल्याही संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे- अहमदनगर महामार्गावर कोरेगाव- भिमा येथे उद्या शौर्यदिन साजरा होणार असल्याने या महामार्गावर वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा महामार्गावर तैनात करण्यात आला आहे. तसेच विजयस्तंभ परिसरात गर्दी होऊ नये यासाठी जाण्या-येण्यासाठी वेगवेगळे मार्ग तयार करण्यात आले आहे. आज सकाळच्या सुमारास पुणे-नगर महामार्गावर वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. विजयस्तंभ परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेराच्या मदतीने नजर ठेवली जात असून या भागात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहे. मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या भाविकांचे स्वागत ही ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे

विजयस्तंभ सजावट सुरु 

दरम्यान, शौर्यदिनाचा निमित्त विजयस्तंभ सजावटीची जोरदार तयारी सुरु आहे. विविध रंगाच्या फुलांची माळ तयार करुन विजयस्तंभाची सजावट सुरु आहे. तर कोरेगाव- भीमा येथे उद्या कोणताही अनुच्चित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. आज भर थंडीत पोलिसांची परेड घेण्यात आली. शौर्यदिनाचा कार्यक्रम शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात व्हावा यासाठी ग्रामस्थांसह प्रशासन गेल्या १५ दिवसांपासून तयारी करत आहेत. पुणे जिल्ह्यात थंडीची मोठी लाट पसरली असतानाही विजयस्तंभ शौर्यदिनासाठी देशभरात विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी अनुयायांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. ग्रामस्थांच्या आणि प्रशासनाच्यावतीने ठिकठिकाणी भाविकांसाठी सर्वसुखसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

११ ड्रोन कॅमेऱ्याची नजर 

पुणे जिल्हाच्या कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभ परिसारात १ जानेवारी २०१८ रोजी मोठा हिंसाचार झाला होता. यावेळी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडले होते. त्यामुळे अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी यावर्षी पोलीस आणि प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोरेगाव भीमाच्या चारही बाजून आठ किलोमीटरच्या परिसरात ११ ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने नजर ठेवली जाणार असल्याची माहिती पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

कोरेगाव भीमा परिसरावर ड्रोनची नजर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -