घरव्हिडिओकोरेगाव-भिमामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात

कोरेगाव-भिमामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात

Related Story

- Advertisement -

कोरेगाव-भिमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. या अनुयायांना कुठल्याही संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे- अहमदनगर महामार्गावर कोरेगाव- भिमा येथे उद्या शौर्यदिन साजरा होणार असल्याने या महामार्गावर वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा महामार्गावर तैनात करण्यात आला आहे. तसेच विजयस्तंभ परिसरात गर्दी होऊ नये यासाठी जाण्या-येण्यासाठी वेगवेगळे मार्ग तयार करण्यात आले आहे. आज सकाळच्या सुमारास पुणे-नगर महामार्गावर वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे.

- Advertisement -