घरमहाराष्ट्रपुणे1 ऑगस्टला आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर, बंडखोरांच्या मतदासंघात दौरा

1 ऑगस्टला आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर, बंडखोरांच्या मतदासंघात दौरा

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत फुट पडली. यानंतर उद्धव ठाकेर आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेला पुन्हा सावरण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आदित्य ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आदित्य ठाकरे थेट बंडखोरांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन सभा घेत असल्याने त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मराठवाड्यात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आदित्य ठाकरे कोकणात जाणार आहेत. तेथील दौरा पूर्ण करून ते कोल्हापूर जिल्ह्यात दौरा करणार आहेत.

आदित्य ठाकरेंचा 1 ऑगस्टला कोल्हापूर दौरा –

- Advertisement -

1 ऑगस्टला संध्याकाळी आदित्य ठाकरे कोल्हापुरात दाखल होणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आज संध्याकाळी निश्चित होणार आहे. याबाबत माहिती कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी यांनी दिली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रॅलीमध्ये ते बोलत होते.

हे आमदार खासदार शिंदे गटात –

- Advertisement -

एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये  जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेही शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. माजी आमदार राजेश क्षीरसागर हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले आहेत.

माजी आमदार नरके आणि मिणचेकर कोल्हापूर दौऱ्यावेळी शिंदे यांच्या सोबत –

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके आणि सुजित मिणचेकर हेसुद्धा शिंदे यांच्या सोबत दिसले होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -