घरमहाराष्ट्ररायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अवकाळी पाऊस

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अवकाळी पाऊस

Subscribe

अवकाळी पावसाने बुधवारी संध्याकाळी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढले. या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी चारच्या सुमारास वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे, कौल कोसळून मोठी नुकसान झाले. कोकणात या पावसामुळे आंबा आणि काजू उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांत संध्याकाळी वादळी वार्‍यासह पाऊस पडला. मुसळधार पाऊस आणि वादळी वार्‍यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. खेड, रत्नागिरी, कणकवलीत अनेक ठिकाणी घरांची कौल आणि छप्पर कोसळून पडली. काही ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे या चारही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी वीज गेली होती.

- Advertisement -

रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत सुमारे एक तास पाऊस कोसळत होता. या पावसामुळे शेतीचे आणि आंबा, काजू उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. हा हापूस आंब्याचा सिझन असल्यामुळे झाडावरील आंबे गळून पडले. काजू फळाचीही तिच परिस्थिती होती. कोल्हापूरमध्ये सूर्यफूल, उन्हाळी भुईमुगाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हा अवकाळी पाऊस आहे. आगामी दोन दिवसात अशा अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. एक तर करोनाचे संकट आणि त्यात आलेल्या या अवकाळी पावसामुळे तेथील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -