घरलाईफस्टाईल'या' समस्यांवर मात करेल हळदीचे पाणी

‘या’ समस्यांवर मात करेल हळदीचे पाणी

Subscribe

धावपळीचे जीवन जगत असताना कोणता आजार कधी कोणाला होईल याचा काही अंदाज बांधता येत नाही. अवेळी खाण्या-पिण्याच्या सवयी, पुर्णवेळ झोप न होणे, सतत मोबाईल- लॅपटॉपचा वापर करणे यामुळे नकळत अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. मात्र, या सर्वांनवर चिमूटभर हळद चांगलेच काम करते. चला तर जाणून घेऊया चिमूटभर हळदीचे लाभदायक फायदे.

विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत

- Advertisement -

शरीराच्या शुद्धीकरणासाठी गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्यायला पाहिजे. हे पेय शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

शरीरातील सूज कमी होते

- Advertisement -

हळदीमध्ये करक्युमिन नावाचे रसायन असते. ते औषध म्हणून काम करते. शरीरातील सूज कमी करण्यासाठी याची मदत होते.

बुद्धी तल्लख होते

तुम्ही सकाळी गरम पाण्यात हळद टाकून ते प्यायले तर तुमची बुद्धी तल्लख राहते.

पित्त वाढते

अनेक रिसर्चनुसार हळद रोज खाल्ल्याने पित्त वाढते, त्यामुळे जेवण पचण्यास मदत होते.

रक्त साफ होण्यास मदत

हळदीचे पाणी प्यायल्याने रक्त गोठत नाही. रक्त साफ होण्यासही मदत होते.

गुडघ्याचे दुखणे

हळदीत करक्युमिन असल्याने गुडघ्याचे दुखणे आणि सूज दूर करण्यात औषधापेक्षा अधिक काम करते.

डायबिटीसचा धोकाही टळतो

बायोकेमिस्ट्री आणि बायोफिजिकल रिसर्चनुसार हळदीचे सेवन केल्याने ग्लुकोजची लेव्हल कमी राहते. तसेच टाइप २ च्या डायबिटीसचा धोकाही टळतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -