घरमहाराष्ट्रदुष्काळ योजनांवरुन 'सामना'च्या सरकाराला कानपिचक्या

दुष्काळ योजनांवरुन ‘सामना’च्या सरकाराला कानपिचक्या

Subscribe

दुष्काळामुळे मराठवाड्याच्या डोळ्यात पाणी आले असून दुष्काळग्रस्त मराठवाड्याला सावरण्यासाठी काय करता येईल याचा निर्णय व्हायलाच हवा, असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून सरकारला कानपिचक्या दिल्या आहेत.

कोट्यवधी रुपये खर्चून केलेला कृत्रिम पावसाचा प्रयोगही मराठवाड्यासाठी हवेतील गोळीबारच ठरला आहे. विक्रमी पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत महापुराच्या तडाख्याने हाहाकार उडाला. मराठवाडा मात्र, दुष्काळाशी झुंजत आहे. दुष्काळाच्या होरपळीतून मराठवाड्यात मागच्या दोन महिन्यांत १३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पावसाळा संपल्यावर तर परिस्थिती आणखी भयावाह होईल. त्यातच निवडणुकांचा बिगुल वाजेल आणि आचारसंहितेच बूच बसेल. त्याआधी दुष्काळग्रस्त मराठवाड्याला सावरण्यासाठी काय करता येईल याचा निर्णय व्हायलाच हवा‘,असं म्हणत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामना अग्रलेखातून सरकारला कानपिचक्या दिल्या आहेत.

मराठवाड्याला सावरा

दुष्काळाच्या राक्षसाने पुन्हा एकदा मराठवाड्याला विळखा घातला आहे. ऐन पावसाळ्यात गतवर्षी जशी दुष्काळी परिस्थिती ओढवली होती, त्यापेक्षाही भीषण संकट यंदा मराठवाड्यासमोर उभे ठाकले आहे. पावसाळ्याचा तिसरा महिना संपत आला, पण मराठवाड्यात आतापर्यंत जेमतेम ४० टक्केच पाऊस झाला आहे. जुलैच्या अखेरीस काही जिल्ह्यात तुरळक सरी कोसळल्या, पण संपूर्ण मराठवाडा ओलाचिंब व्हावा अशी संतधार या पावसाळ्यात कोसळलीच नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नांदेड, हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्यांत तब्बल दीड महिन्यानंतर पावसाच्या सरी कोसळल्या, पण लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि संभाजीनगर या पाच जिल्ह्यांवर मात्र, पावसाने आपला रुसवा कायम ठेवला आहे. निसर्गाचा आणि पावसाचा इतका लहरीपणा मराठवाड्याने आजवर कधीही अनुभवला नव्हता. आता तर ऑगस्टही संपत आला. त्यामुळे मराठवाड्याची सगळी भिस्त उरली आहे ती सप्टेंबर महिन्यातील परतीच्या पासावरच. पहिले तीन महिने तर पावसाचे मराठवाड्याच्या डोळ्यांत पाणी आणेले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात भर’पूर’; मराठवाडा मात्र अजूनही कोरडाच


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -