घरगणेशोत्सव २०१९शेण-मातीपासून साकारली बाप्पाची मूर्ती

शेण-मातीपासून साकारली बाप्पाची मूर्ती

Subscribe

ग्रीन अंब्रेलाच्या माध्यमातून तयार केलेली मूर्ती मुंबईकरांच्या भेटीला

हिंदू धर्मात गाईला देवता मानले जाते. तसेच गाईच्या पंचगव्यांना आयुर्वेदात मोठे महत्त्व असल्याचे लक्षात घेत तळेगावमधील मुर्तिकार प्रसाद सिंदगी यांनी माती- गाईच्या पंचगव्यांपासून गणेशमुर्ती साकारल्या आहेत. पण, मुंबईकरांना या गणेशमुर्ती उपलब्ध करून द्याव्यात या उद्देशाने ग्रीन अंब्रेला संस्थेने पुढाकार घेतला आहे. १०० मुर्ती या वर्षी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसंच, पुढील वर्षी यापेक्षा जास्त मुर्ती मुंबईकरांसाठी उपलब्ध करुन देण्याचा संस्थेचा मानस आहे.

पंचगव्यांपासून साकारला बाप्पा

यावर्षी दिखाऊ मुर्तिंकडे न बघता पर्यावरण पुरक मुर्ती घेण्याकडे गणेश भक्तांचा कल दिसून येतो. या गणेशमुर्ती माती आणि गाईचे शेण,दुध, दही, तुप, लोणी, गोमुत्र अशा पंचगव्यांच्या मिश्रणातून बनवण्यात आल्या आहेत. तसेच, या मुर्तीत काही प्रमाणात तुरटी देखील वापरण्यात आली आहे. ही कल्पना करत असताना तुरटीमुळे तलावातील पाणी शुद्ध होईल, शेणात असणारे फॉस्फरस जिवाणू नष्ट करतात आणि पॉटेशिअममुळे पाणी स्वच्छ होईल, शेणामध्ये असणारे फायबर माशांना उपयुक्त असेल हा विचार मुर्तिकार प्रसाद यांच्या मनात आला. तसंच, मुर्तीच्या आसपासच्या परिसरात किंवा कुंडीत विसर्जन केल्यासही खत म्हणून वापर होऊ शकेल, या उद्देशातून केलेली संकल्पना मुर्तिकार प्रसादने सत्त्यात उतरवली आणि या मुर्ती तयार झाल्या.

ग्रीन अंब्रेला संस्थेकडून अनेक पर्यावरणाच्या संरक्षणासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या पर्यावरण पुरकमूर्ती पर्यावरणाचा र्‍हास टाळू शकतील, या उद्देशातून मुंबईकरांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.

– विक्रम येंधे, संस्थापक अध्यक्ष, ग्रीन अंब्रेला

- Advertisement -

मुर्ती बनवण्यासाठी या वर्षी ८ इंचापासून सव्वा दोन इंचा पर्यंतच्या या मुर्तीची किंमत अंदाजे ८०० ते ३००० रुपये असल्याने या मुर्ती भक्तांच्या पसंतीस उतरत आहेत. तसेच यामुर्ती मुंबई , पुणे, अमेरिका आणि दुबईतही पाठवण्यात आल्या आहेत. मुर्तिसोबत एक गणेश एक झाड ही कल्पना करून गणपती बाप्पासोबत देण्यात येणार्‍या मोदकामध्ये १ देशी प्रजातीच्या झाडांची बी टाकण्यात आली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -