घरमुंबईजिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचे दरमहा १ तारखेला होणार वेतन

जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचे दरमहा १ तारखेला होणार वेतन

Subscribe

जिल्हा परिषदच्या शाळेतील शिक्षकांना जर १ तारखेला वेतन झाले नाहीतर गंभीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिला आहे.

जिल्हा परिषदेतील सुमारे साडेतीन हजारांहून अधिक शिक्षकांचे दरमहिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत रखडणारे वेतन आता दरमहा १ तारखेला होणार आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी वेतनासंदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आदेश दिले असून, वेळेवर वेतन न झाल्यास गंभीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या १ हजार ३३१ प्राथमिक शाळांमध्ये ३ हजार ६५२ शिक्षक-शिक्षिका कार्यरत आहेत. बहुसंख्य शिक्षकांचे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (टीजेएसबी) खात्यात वेतन जमा होते. मात्र, तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे अनेक वेळा महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वेतन रखडत होते.

नक्की वाचा ठाणे झाले खड्ड्यांचे स्मार्टसिटी?

- Advertisement -

या काळात घराचे हप्ते, मुलांच्या शाळेची फी आणि इतर खर्च भागविण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता होती. या संदर्भात काही शिक्षकांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती सुभाष गोटीराम पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर या प्रश्नावर सुभाष पवार यांनी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, शिक्षण विभाग, अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसह पंचायत समितीत तालुका पातळीवर बैठका घेतल्या. त्यातून ‘वेतन दिरंगाई’ची कारणे समोर आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -