घरमहाराष्ट्रमुंबईसह ठाणे, डोंबिवलीत विजांच्या कडकडाटासह मुळसधार पावसाची हजेरी, या राज्यांना अलर्ट

मुंबईसह ठाणे, डोंबिवलीत विजांच्या कडकडाटासह मुळसधार पावसाची हजेरी, या राज्यांना अलर्ट

Subscribe

राज्यात आज सकाळपासून मुंबई, ठाणे, डोंबिवलीसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह या भागांत पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नांदिवली, केळकर रोड, डोंबिवली स्टेशन परिसर आणि दादर, प्रभादेवी परिसरातील काही भाग जलमय झाला आहे.

दरम्यान मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. यानंतर 10 वाजल्यापासून अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळू लागल्या. डोंबिवलीमध्ये सकाळापासून 94.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर ठाणे, मुंबई मध्य आणि पूर्व उपनगरातही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. ज्यामुळे दादर, एल्फिन्स्टनमधील सखल भागात पाणी साचू लागल आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे उपसंचालक होसाळीकर यांनी ट्विट करत दिली आहे.

- Advertisement -

याच पुढील दोन दिवस मुंबईसह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. यात पावसाच्या हलक्या आणि मध्यम सरी बरसण्य़ाची शक्यता आहे. यानंतर 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी देखील राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातही विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

तर मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर. विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


दसऱ्याला शिवाजी पार्कमध्ये तमाशाकारांचा मेळावा; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -