घरठाणेकोपरीतील शाखा ताब्यात घेण्यावरून शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने; परिसरात तणावाचे वातावरण

कोपरीतील शाखा ताब्यात घेण्यावरून शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने; परिसरात तणावाचे वातावरण

Subscribe

दोन्ही गटाचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाल्यावर शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गट आमने सामने आले. त्यामुळे त्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले. पोलिसांनी वेळीच धाव घेत, चोख बंदोबस्त तैनात केला. तसेच याची माहिती मिळताच शिंदे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, माजी नगरसेवक राम रेपाळे यांच्यासह कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले ते शाखेत जाऊन बसले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shdine) यांच्या कोपरी पांचपाखाडी या विधानसभा मतदारसंघातील कोपरीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांचे समर्थक शुक्रवारी आमनेसामने आले होते. कोपरी पूर्व येथील कुंभारवाडा परिसरातील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून हे दोन गट भिडल्याचे पाहण्यास मिळाले. त्यामुळे या परिसरात काळ तणावाचे वातावरण पसरल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. तसेच पोलिसांनी त्या दोन्ही गटांना शाखेची चावी देऊन वादावर पडदा टाकण्याचे काम केले. तसेच दसरा मेळाव्याचा ठाकरे गटाचा बॅनर शिंदे गटाने शाखेवरून हटवला.

मुख्यमंत्री शिंदे ज्या मतदार संघातून निवडून आलेले त्या मतदार संघात कोपरीतील कुंभारवाडा येतो. तसेच शिवसेनेची शाखा असून ती शाखा शिंदे गटाकडून नुतनीकरण करण्यात येणार आहे. परंतु ही शाखा तोडणार आहेत, अशी अफवा पसरली. त्यानंतर शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उपनेत्या अनिता बिर्जे हे कृष्णकुमार कोळी या ठाकरे समर्थकांनी शाखेकडे धाव घेतली. त्याचवेळेस शाखेत शिंदे गटाचे प्रकाश कोटवानी, रोहित गायकवाड , माजी नगरसेवक मालती पाटील आणि शर्मिला पिंपोळकर या आदी उपस्थित होत्या.

- Advertisement -

याचदरम्यान दोन्ही गटाचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाल्यावर शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गट आमने सामने आले. त्यामुळे त्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले. पोलिसांनी वेळीच धाव घेत, चोख बंदोबस्त तैनात केला. तसेच याची माहिती मिळताच शिंदे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, माजी नगरसेवक राम रेपाळे यांच्यासह कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले ते शाखेत जाऊन बसले. दरम्यान पोलिसांनी वाद वाढू नये यासाठी, दोन्ही गटांना शाखेची चावी देऊन वाद मिटविला. पाहिले ठाकरे गटाचे त्यानंतर, शिंदे गटाचे पदाधिकारी तेथून निघून गेले. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील मनोरमानगर भागात वाचनालय ताब्यात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे हे दोन्ही गटात वाद झाले होता.

ठाकरे गटाचा दसऱ्याचा बॅनर हटवला

- Advertisement -

शाखेवर दसरा मेळावा निमित्त लावलेला उद्धव ठाकरे यांचा बॅनर शाखेतून निघताना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हटवला. तो बॅनर एका बाजूला नेल्याचे पाहायला मिळाले. ” या शाखेचे आम्ही नूतनीकरण करत आहोत. तर काही जणांनी ही शाखा तोडण्यात येणार आहे अशी माहिती दिल्याने हा प्रकार घडला. तर या शाखेमध्ये भगव्याशी एक निष्ठ असणाऱ्यांनीच शाखेत येऊ बसावे.” असं ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के म्हणाले.


हे ही वाचा – शिवसेना नोंदणीकृत पक्ष, राज्यात काय करायचं हे तुम्ही ठरवणार का?, अरविंद सावंतांचा हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -