घरमहाराष्ट्रमला गायचं होत, पण...; राज ठाकरे असं का म्हणाले?

मला गायचं होत, पण…; राज ठाकरे असं का म्हणाले?

Subscribe

 

मुंबईः मी ठरवून कोणाची मिमिक्री करत नाही. भाषणाच्या ओघात ते होतं. मी असं ठरवतं नाही की आज याची मिमिक्री करायची किंवा त्याची मिमिक्री करायची. ओघाओघात ते होत असतं. मला आज गाणं म्हणायचं होतं. पण जाऊ द्या, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना लगावला.

- Advertisement -

एका कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला की, तुम्ही मेमेक्री खूप छान करता. तर तुम्हाला कोणाची मेमेक्री करायला आवडेल. राज ठाकरे म्हणाले, मी ठरवून मेमेक्री करत नाही. भाषणाच्या ओघात ते होऊन जातं. पण आता मला मेमक्री करायची होती. मला गायचं होत. पण जाऊ द्या… यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, तुम्ही गा…

तुम्ही तुमचा बायोपिक केलात तर कोणाला अभिनेता म्हणून घ्याल किंवा तुम्हाला कोणाची बायोपिक करायला आवडेल, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, बायोपिक करायचीच झाली तर इंदिरा गांधी यांच्यावर करता येईल. अमिताभ बच्चन किंवा लता मंगेशकर यांच्यावर करता येईल. कसं असतं संघर्षाचा काळ निघून गेला की सर्व संपत. पुढे काही नसतं. त्यामुळे या दिग्गजांची बायोपिक नक्की करायला आवडेल.

- Advertisement -

महाराष्ट्राचा आवडता मुख्यमंत्री कोण याचे उत्तर देताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं नाही. मात्र विलासराव देशमुख हे प्रभावशाली मुख्यमंत्री होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे आवडते मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून छाप पाडायला वेळ लागेल. मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री पदाचा बाज राखला. पण नारायण राणे यांनी मुख्यमंत्री असताना कामाचा जो सपाटा लावला तो दाद देण्यासारखा होता, असे राज ठाकरे यांनी सांगिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा शरद पवार हे आवडते व्यक्तिमत्त्व नाहीत. कारण माझं आवडतं व्यक्तिमत्त्व हे बाळासाहेब ठाकरेच आहेत. हा पण मोदी आणि शरद पवार हे दोघेही कामाला वाघ आहेत, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -