घरताज्या घडामोडीराज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर, मनसेचा वर्धापन दिन सोहळा पहिल्यांदाच मुंबईबाहेर...

राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर, मनसेचा वर्धापन दिन सोहळा पहिल्यांदाच मुंबईबाहेर होणार

Subscribe

राज्यात महापालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुकींसाठी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आहेत. राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. यंदाचा मनसेचा १६ वा वर्धापनदिन पुण्यात होणार आहे. तसेच मनसेचा यंदाचा वर्धापनदिन पहिल्यांदाच मुंबईबाहेर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

येत्या ९ मार्चला मनसेचा १६ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरू आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात मनसेचा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला मनसेचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी देखील माहिती आहे.

- Advertisement -

राज ठाकरे उद्या सकाळी मनसे पदाधिकाऱ्याच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. तर संध्याकाळी राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यभूषण दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे. पहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन मुंबई बाहेर होणार आहे. राज ठाकरे यांनी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक येथील महापालिकाच्या निवडणुकीची तयारी सुरू केलीय. राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांवर मनसेने लक्ष केंद्रीत केलं आहे.


हेही वाचा : Nawab Malik : नवाब मलिकांची प्रकृती खालावली, उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -