घरताज्या घडामोडीRussia Ukraine War: रशिया अपयशी, युक्रेन हल्ल्यात ४५० जवान गमावले; ब्रिटनच्या संरक्षण...

Russia Ukraine War: रशिया अपयशी, युक्रेन हल्ल्यात ४५० जवान गमावले; ब्रिटनच्या संरक्षण सचिवांची माहिती

Subscribe

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात दोन्ही देशांच्या सैनिकांचा मृत्यू होत आहे. तसेच याबाबत काही देश वेगवेगळे दावे करत आहेत. यादरम्यान ब्रिटनच्या संरक्षण सचिवांनी म्हटले की, ‘या युद्धात रशियाने आतापर्यंत आपल्या ४५०हून अधिक लोकांना गमावले आहे. रशियाला पहिल्याच दिवशी आपले लक्ष्य गाठण्यासाठी अपयश आले.’

रशियाला मिळालं अपयश

एका टीव्ही चॅनलसोबत बातचित करताना ब्रिटनचे संरक्षण सचिव बेन वालेस म्हणाले की, ‘आज सकाळपर्यंतचे आमचे मूल्यांकन असे आहे की, रशियाने आतापर्यंत आपल्या कोणतेही प्रमुख उद्देश पूर्ण केले नाही. रशिया आपल्या अपेक्षित वेळापत्रकाच्या खूप मागे आहे. रशियाने ४५०हून अधिक जवान गमावले आहेत. दरम्यान रशिया यूक्रेनच्या महत्त्वापूर्ण विमानतळांपैकी एकावर कब्जा करू इच्छित होता. परंतु यामध्ये रशियाला अपयश मिळाले आहे. युक्रेनच्या सैनिकांनी रशियाच्या ताब्यातून विमानतळ सोडवले आहे.’

- Advertisement -

युक्रेनचे संरक्षण मंत्रालय म्हणाले की, ‘रशियाच्या प्रत्येक कारवाईवर युक्रेनकडून तोडीस तोड उत्तर दिले जात आहे.’ युक्रेनचे संरक्षण मंत्रालयाचे उपप्रमुख म्हणाले की, ‘६ स्फोट झाले आहेत.’ तर वालेस म्हणाले की, ‘पुतीन जे करत आहेत ते तर्कहीन आहे, असे मला निश्चित स्वरुपात वाटत आहे.’

२४३ युक्रेनचे सैनिक रशियाला शरण

दरम्यान रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, ‘आतापर्यंत २४३ युक्रेनचे सैनिक आणि एक मरीन ब्रिगेड शरण आले आहेत. तसेच युक्रेनचे ११८ मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त केले आहेत. ज्यामध्ये ११ मिलिट्री एअर फील्ड, १३ कमांड अँड कम्युनिकेशन सेंटर, 14s 300 मिसाईल सिस्टम आणि ३६ रडार स्टेशन सामिल आहेत.’

- Advertisement -

हेही वाचा – Ukraine-Russia War: सायकलस्वारावर थेट बॉम्बहल्ला; पाहा थरारक Video


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -