घरमहाराष्ट्रराज्यातील राजकीय परिस्थितीवर राज ठाकरेंची मोजक्या शब्दात टीका; "सरकार आणि पाऊस कधी..."

राज्यातील राजकीय परिस्थितीवर राज ठाकरेंची मोजक्या शब्दात टीका; “सरकार आणि पाऊस कधी…”

Subscribe

या महिन्याच्या एका तारीख निवडून येथेच मुलाखतीसाठी येईल, असा शब्द देखील राज ठाकरेंनी यावेळी दिला.

मुंबई : ‘दिंडोशी सांस्कृतिक महोत्सवात’ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गोरेगावमध्ये हजेरी लावली होती. या महोत्सवानिमित्ताने सध्याच्या परिस्थितीवर राज ठाकरेंची मुलाखत होणार होती. पण अचानक पाऊस पडल्यामुळे राज ठाकरेंनी मुलाखत देण्यास नकार दिला. सध्या सरकार आणि पाऊस कधी कोसळतील काही कळत नाही, अशी मोजक्या शब्दात राज ठाकरेंनी मुलाखत देण्यास नकार राजकीय परिस्थितीवर टीका केली.

राज ठाकरे म्हणाले, “अचानक पाऊस सुरू झाला, कोणाला काही कळत नाही. सध्या सरकार आणि पाऊस हे कधी येतील आणि कधी कोसळतील काही कळत नाही. मुलाखत सुरू असताना, एकदा आमच्या डोक्यावर छप्पर आहे पण तुमच्या डोक्यावर नाही, त्यात पाऊस अशा परिस्थिती मी मुलाखत देऊ इच्छित नाही. मी त्यांना विचारले हे काही काढता येईल का? पण नाही कारण त्याला सर्व दिवे लटकविले आहेत. पाऊस पडत असताना माझा मुलाखत देण्याचा काही मूड लागणार नाही. यामुळे आजची मुलाखत तुर्तास स्थगित करू”, असे राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात बाळासाहेबांनंतर सर्वमान्य नेतृत्व शिल्लक राहिलं नाही; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला

राज ठाकरेंनी मुलाखत देण्याचा दिला शब्द

या महिन्याच्या एका तारीख निवडून येथेच मुलाखतीसाठी येईल, असा शब्द देखील राज ठाकरेंनी यावेळी दिला. राज ठाकरे म्हणाले, “त्यावेळी राजकारणात ज्या काही गोष्टी सुरू आहेत. त्याबद्दल मी तेव्हा सविस्तर बोलेण. मी पुढची तारीख लवकरच जाहीर करणे. त्यावेळी तुम्ही सर्वांनी यावे, असे मी माझ्याकडून तुम्हाला आमत्रंण देतोय.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -