घरताज्या घडामोडीSwara Bhasker: 'बलात्काराच्या आरोपीला वाचवत...', कुस्तीपटूंना पाठिंबा देणारे स्वरा भास्करचे ट्वीट चर्चेत

Swara Bhasker: ‘बलात्काराच्या आरोपीला वाचवत…’, कुस्तीपटूंना पाठिंबा देणारे स्वरा भास्करचे ट्वीट चर्चेत

Subscribe

ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांना अटक करावी, अशी मागणी कुस्तीपटू सातत्याने करत आहेत. मंगळवारी (३० मे) साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी एक निवेदन जारी करत, आपण देशासाठी मिळवलेली पदकं गंगेत (Ganges River) विसर्जित करण्यासाठी हरिद्वारला जात आहोत, असे म्हटले होते. शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी त्याठिकाणी धाव घेत कुस्तीपटूंना रोखण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी प्रचंड गदारोळ सुरू होता.

मागील अनेक महिन्यांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात हे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. मात्र, या कुस्तीपटूंची दिल्ली पोलिसांकडून धरपकड केली जात आहे. त्यामुळे सर्वच स्तारावरून दिल्ली पोलिसांचा निषेध केला जात आहे. नुकताच याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित करण्याचा इशारा युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) ने दिला. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेही या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. (swara bhasker tweet in support of wrestlers agitation actress share tweet)

- Advertisement -

स्वरा भास्करचे ट्वीट

अभिनेत्री स्वरा भास्कर (swara bhasker) हिने एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये ‘तपास यंत्रणा ब्रिजभूषण शरण सिंह यांना वाचवत आहे’, असे लिहिले आहे. तसेच, कुस्तीपटू हरिद्वारला गंगेत आपली पदकं विसर्जित करणार असल्याचे ANI ने ट्वीट केले होते. या ट्वीटवर स्वरा भास्करने “आमच्या सरकारची मर्यादा तरी बघा… मला या सगळ्याचे आश्चर्य वाटत आहे. तपास यंत्रणा बलात्काराच्या आरोपीला वाचवत आहेत. हे खूप लज्जास्पद आहे”, असे लिहिले होते. तसेच, साक्षी मलिकचे वक्तव्य शेअर करत स्वरा भास्करने लिहिले की, ‘भारताची मान शरमेने झुकत आहे’. दरम्यान, स्वरा भास्करचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Wrestlers Protest : भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूंसोबत… आदित्य ठाकरेंची टीका

- Advertisement -

ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांना अटक करावी, अशी मागणी कुस्तीपटू सातत्याने करत आहेत. मंगळवारी (३० मे) साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी एक निवेदन जारी करत, आपण देशासाठी मिळवलेली पदकं गंगेत (Ganges River) विसर्जित करण्यासाठी हरिद्वारला जात आहोत, असे म्हटले होते. शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी त्याठिकाणी धाव घेत कुस्तीपटूंना रोखण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी प्रचंड गदारोळ सुरू होता.

भारताचे प्रख्यात कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि इतर कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह याच्या अटकेसाठी जंतर-मंतरवर जवळपास महिनाभर आंदोलन करत होते. रविवारी (२८ मे) दिल्ली पोलिसांसोबत कुस्तीपटूंची बाचाबाची झाली. यानंतर त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हे नोंदवले होते. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे. यामध्ये एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूचा देखील समावेश आहे.

हेही वाचा – कुस्तीपटूंनी पदके विसर्जीत करण्याचा निर्णय घेतला मागे, शेतकरी नेत्यांनी काढली समजूत

युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचा भारतीय कुस्ती महासंघाला इशारा

“अनेक महिन्यांपासून, आम्ही भारतातील परिस्थितीबद्दल चिंतित आहोत, जिथे कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरुद्ध छळ आणि शोषणाचा आरोप करत निदर्शने करत आहेत. आम्ही पाहिले आहे की WFI अध्यक्षांना सुरुवातीला बाजूला केले गेले होते आणि आता ते कुस्तीचे कामकाज पाहत नाहीत”, असे UWW ने सांगितले.

“गेल्या काही दिवसातील घडामोडी अधिक चिंताजनक आहेत. कारण आंदोलनामुळे कुस्तीपटूंना पोलिसांनी तात्पुरते ताब्यात घेतले होते. त्यांच्या आंदोलनाचे ठिकाणही रिकामे करण्यात आले. पैलवानांच्या अटकेचा आम्ही निषेध करतो. याशिवाय तपासाचे निकाल अद्याप न आल्याने त्यांनी निराशाही व्यक्त केली. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची विनंती करतो”, असे UWW ने सांगितले.

“आम्ही कुस्तीपटूंशी त्यांची स्थिती आणि सुरक्षिततेबाबत बोलू आणि त्यांच्या तक्रारींचे निष्पक्ष आणि न्याय्य निराकरण करण्याच्या बाजूने आहोत. शेवटी आम्हाला पुढील सर्वसाधारण सभेबाबत आयओए आणि तदर्थ समितीकडून माहिती हवी आहे. निवडणुकीसाठी दिलेली 45 दिवसांची मुदत पाळली पाहिजे. त्यातच निवडणुका न घेतल्यास डब्ल्यूएफआय निलंबित केले जाऊ शकते, जेणेकरून खेळाडू तटस्थ ध्वजाखाली खेळतील”, UWW म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -