घरमहाराष्ट्रपुणे97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे

97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे

Subscribe

पुणे – अमळनेर येथे होणाऱ्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Marathi Sahitya Sammelan) अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे (Ravindra Shobhane) यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात रविवारी झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत रवींद्र शोभणे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

रवींद्र शोभणे हे कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक आहेत. रवींद्र शोभणे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यात झाला. नरखेड तालुक्यात खरसोली या गावी त्यांचा जन्म झाला. खरसोलीच्या आदर्श विद्यालयातून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण नरखेड येथे तर पदव्युत्तर शिक्षण नागपूर येथील मॉरिस महाविद्यालयात केलं.

- Advertisement -

1989 मध्ये त्यांनी पीएच.डी.ची पदवी मिळवली. कथालेखक म्हणूनही ते परिचित आहेत. 1991 मध्ये त्यांचा ‘वर्तमान’ हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. हे संमेलन डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संमेलनाचे आयोजन होण्याची शक्यता आहे.

अमळनेर येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान कोणाला मिळणार, याची साहित्य वर्तुळात मोठी उत्सुकता लागली होती. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी यांची नावेही अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. परंतु रवींद्र शोभणे यांचे नाव बहुमताने निवडण्यात आले. बैठकीत संमेलनाच्या तारखांवरही विचार करण्यात आला.

- Advertisement -

2 फेब्रुवारी 2024 पासून हे साहित्य संमेलन होणार आहे. 2,3 आणि 4 फेब्रुवारी दरम्यान साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी दिली.


हेही वाचा : समृद्धी महामार्गाला चंद्रपूर जोडण्याचा विचार करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -