घरमहाराष्ट्रRavindra Waikar : रवींद्र वायकर अखेर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; आज संध्याकाळी वर्षावर...

Ravindra Waikar : रवींद्र वायकर अखेर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; आज संध्याकाळी वर्षावर पक्षप्रवेश

Subscribe

मातोश्रीचे निकटवर्तीय असलेले उद्धव गटाचे जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर हे रविवार, १० मार्च रोजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची महिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

मुंबई : मातोश्रीचे निकटवर्तीय असलेले उद्धव गटाचे जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर हे रविवार, १० मार्च रोजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची महिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. रविवारी संध्याकाळी ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश होईल. दरम्यान, 15 मार्च पूर्वी मूळ शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून रवींद्र वायकर हे शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणार असल्याचे वृत्त ‘महानगर’ने तीनच दिवसांपूर्वी दिले होते, तेच आता खरे ठरताना दिसत आहे. ईडीची पिडा मागे लागल्याने वायकर पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होत्या, वयकरांच्या पक्ष प्रवेशाने आज त्याला पूर्णविराम मिळणार आहे. तर, उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, वायकर शिवसेनेत प्रवेश करणार असतानाच उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे जोगेश्वरीतच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. (Ravindra Waikar will eventually join Shinde’s Shiv Sena; Party entry on ‘Varsha’ this evening aab)

हेही वाचा… Ajit Pawar : सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला अजित पवारांचे उत्तर, बहिण-भावात रंगला कलगीतुरा

- Advertisement -

रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप आहेत. याप्रकरणी त्यांची ईडी चौकशीही सुरू आहे. या ईडी चौकशीवरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका देखील केली होती. ठाकरे गटाच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स या केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून दबाव आणल्या जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे राऊत यांनी वारंवार केला आहे. रवींद्र वायकर यांच्यामागे जोगेश्वरीतील जागेवरुन ईडीचा ससेमिरा लागला आहे. जोगेश्वरीमधील राखीव भूखंडावर वायकरांनी पंचतारांकित हॉटेल उभे केल्याचा आरोप आहे. यातून त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला असल्याचा आरोप करत ईडीने त्यांची सखोल चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणी एकटे आमदार वायकरच अडकलेले नाहीत तर त्यांच्या पत्नीविरोधातही गुन्हा दाखल आहे.

रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षही होते. मुंबई महापालिकेला शिवसेना ठाकरे गट आपली तिजोरी समजत होता, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला होता. ठाकरे आणि वायकर कुटुंबियांनी रायगड जिल्ह्यात बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचाही आरोप सोमय्यांनी केला होता. जोगेश्वरीतील राखीव भूखंड अपहार प्रकरण आणि रायगडमधील बेहिशोबी मालमत्तेमुळे वायकर ईडीच्या रडारवर आले आहेत.

- Advertisement -

दोन मुहूर्त टळले, तिसरा यशस्वी होणार

ईडी चौकशीच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी वायकरांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत सूत जळवण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचा, 9 फेब्रुवारीला शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला होता. मात्र त्याच्या पूर्वसंध्येला दहिसरचे माजी नगरसेवक आणि ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसळकर यांच्यावर गोळीबाराची घटना घडली. त्यामुळे तो मुहूर्न टाळला. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्थात 1 मार्चला वायकर शिंदे गटात प्रवेश करतील असे ठरले होते, तोही मुहूर्त टळला. अधिवेशनादरम्यान वायकर हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा शिवसेना नेत्यांबरोबर फार कमी दिसले होते. आता लोकसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी म्हणजेच पुढील आठवड्यात 15 मार्चपूर्वी वायकरांचा शिंदे गटात प्रवेश होण्याचे निश्चित मानले जात आहे. वायकरांनी देखील हा तिसराच मुहूर्त साधला आहे.

जोगेश्वरीतील माझा एकही शिवसैनिक फुटणार नाही – उद्धव ठाकरे

जोगेश्वरीतील शिवसैनिक फुटणार नाहीत, असे विधान माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केले. ठाकरे यांच्या या विधानानंतर आमदार रवींद्र वायकर पक्षांतर करणार नसल्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. उद्धव ठाकरे यांची जोगेश्वरी पूर्वमध्ये जनसंवाद सभा पार पडली. उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचे काही गद्दार फोडले म्हणून शिवसैनिक आपल्याकडे येतील, असे यांना वाटले होते, मात्र अंधेरी, जोगेश्वरी आणि उत्तर पश्चिम जिल्हा मतदारसंघातील शिवसैनिक फुटणार नाहीत, असे ठाकरे म्हणाले.
मात्र, त्यानंतर लगेचच वायकर यांच्या पक्ष प्रवेशाची बातमी आली आहे.

कोण आहेत रवींद्र वायकर ?

जोगेश्वरी भागातून 1992 मध्ये रवींद्र वायकर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर निवडून गेले. 2006-2010 या काळात वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून वायकर आमदार म्हणून निवडून आले. महाविकास आघाडी सरकारमध्ये रवींद्र वायकर यांच्याकडे गृहनिर्माण आणि उच्च – तंत्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्रीपदाची धुरा होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -