घरमहाराष्ट्रआपले सांगाडे बाहेर निघतील हे लक्षात आल्यामुळे...; फडणवीसांनी पाटण्यातील बैठकीवर साधला निशाणा

आपले सांगाडे बाहेर निघतील हे लक्षात आल्यामुळे…; फडणवीसांनी पाटण्यातील बैठकीवर साधला निशाणा

Subscribe

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकारला 9 वर्ष झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून (BJP) आज ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना मोदींनी पाटण्यामध्ये झालेल्या सभेवरून विरोधी पक्षांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, पाटण्यामध्ये जमा झालेल्या लोकांची एकूण संख्या बघितली तर सर्व मिळून किमान 20 लाख कोटींचा घोटाळा होण्याची हमी आहे आणि केवळ काँग्रेसचा घोटाळा लाखो कोटींचा आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना विचारले असता ते म्हणाले की, मोदी बोलले हे खरंच आहे. आपले सांगाडे बाहेर निघतील हे लक्षात आल्यामुळे हे सगळे एकत्र आले. फडणवीस आज जळगाव दौऱ्यावर जात आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षांवर आरोप केला. (Realizing that our skeletons will come out Fadnavis targeted the meeting in Patna)

हेही वाचा – केसीआर ही बीजेपीची बी टीम; सोलापूर दौऱ्यावरून संजय राऊतांचा पुन्हा एकदा हल्लाबोल

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदी बोलले हे खरंच आहे, कारण ही सगळी मंडळी एकत्र का आली? कुठल्या मोठ्या उद्देशाने आली का? मोदी यांनी केलेल्या विकास कार्यापेक्षा मोठं विकास कार्य आम्ही करून दाखवू असं कोणी भाषण केलं का? हे सगळे एकत्रित आले आहेत याचं कारण यांनी केलेले घोटाळे बाहेर निघत आहेत. त्याच्यावर कारवाई होत आहे आणि मोदींचं शासन राहिलं तर ही कारवाई होतच राहिलं. आपले सांगाडे बाहेर निघतील हे लक्षात आल्यामुळे हे सगळे एकत्र आले आहेत आणि त्याचाच उल्लेख मोदींनी केला आहे. पण भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा मोदींवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे जनता मोदींच्या पाठीशी उभी राहिल.

हेही वाचा – BRS नक्की कोणाची टीम? मुख्यमंत्री KCR यांनीच दिले उत्तर…

- Advertisement -

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, आजकाल एक नवीन शब्द खूप लोकप्रिय होत आहे. तो शब्द तुमच्याही कानावर पडला असेल, तो शब्द हमी आहे. त्याबद्दल लोकांना सांगणे ही भाजपा कार्यकर्त्यांची मोठी जबाबदारी आहे. कारण हवी विरोधी पक्षाची आहे. हे सर्व लोक, पक्ष भ्रष्टाचाराची आणि लाखो करोडो रुपयांच्या घोटाळ्याची ही हमी देतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा फोटो काढण्याचा कार्यक्रम झाला. जर तुम्ही या बैठकीत सहभागी झालेल्या पक्षांचा इतिहास पाहिला तर तुम्हाला समजेल की फोटोमध्ये दाखवलेले सर्व लोक एकत्र आहेत. त्या प्रत्येकाकडे पाहिले आणि सर्वांची एकूण संख्या पाहिली तर सर्व मिळून किमान २० लाख कोटींचा घोटाळा होण्याची हमी आहे आणि केवळ काँग्रेसचा घोटाळा लाखो कोटींचा आहे, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -