घरताज्या घडामोडीअंत्यसंस्कारासाठी डिझेलचे पैसे मागितले, नातेवाईकांनी सरणाच्या लाकडांनीच कर्मचाऱ्यांना धोपटले

अंत्यसंस्कारासाठी डिझेलचे पैसे मागितले, नातेवाईकांनी सरणाच्या लाकडांनीच कर्मचाऱ्यांना धोपटले

Subscribe

अंत्यसंस्कार करण्याआधीच स्मशानभूमीत एकच गोंधळ उडाला.

राज्यात वेळेवर उपचार न मिळाल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू होत आहे. स्मशानभूमीत मृतदेहांचे खच पडले आहे. नातेवाईकही संतप्त झाले आहेत. नागपूरच्या मोक्षधाम घाट स्मशानभूमीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना थेट सरणासाठी रचून ठेवलेली लाकडे उचलून बेदम मारहाण केली. जिजाबाई कांबळे असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला होता. कोरोनाच्या नियमांनुसार त्यांना मोक्षधाम स्मशानभूमीत आणण्यात आले. मात्र त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याआधीच स्मशानभूमीत एकच गोंधळ उडाला.

जिजाबाई यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी मोक्षधान स्मशानभूमीत त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्यांना सरणावर लाकडे रचून दिली. मृतदेह पेटवण्यासाठी पेट्रोल हवे आहे असे नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. कर्मचाऱ्यांनी ५०० रुपये द्या पेट्रोल देतो असे नातेवाईकांना सांगितले. यावर संतप्त झालेल्या नातवाईकांनी थेट महिलेसाठी रचलेल्या सरणावरील लाकडे उचलून कर्मचाऱ्याला मारहाण केली.

- Advertisement -

मारहाण केल्याप्रकरणी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांकडे डिझेल आणण्यासाठी वेळ नसतो किंवा त्यांना शक्य होत नाही म्हणून आम्ही त्यांना डिझेल देतो. त्याबदल्यात ५०० रुपये मागितले म्हणून त्यांनी मारहाण केल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. असे प्रकार होऊ नये म्हणून स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली जात आहे.


हेही वाचा – 25 हजारांना रेमडेसिवीर विकणारा डॉक्टर जाळ्यात

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -