घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर'चोर आले पन्नास खोके घेऊन' गाण्याचा रॅपर कुठे आहे? जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट

‘चोर आले पन्नास खोके घेऊन’ गाण्याचा रॅपर कुठे आहे? जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट

Subscribe

या रॅपरचा कोणताच ठावठिकाणा लागत नसून त्याचे कुटुंबीय सध्या चिंतेत आहेत. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट शेअर केलंय.

‘शिंदे-फडणवीस’ सरकार आल्यापासून त्यांच्या दांड्या गुल करणारं एक रॅप सॉंग ‘चोर आले पन्नास खोके घेऊन’ हे गाणं प्रचंड गाजलं. या रॅप सॉंगमुळे नव्या सरकारचे चांगलेच धाबे दणाणले. शिंदे गटाच्या युवासेना कोअर कमिटीच्या सदस्य असलेल्या स्नेहल कांबळे यांनी या रॅपविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. परंतू त्यानंतर या रॅपरचा कोणताच ठावठिकाणा लागत नसून त्याचे कुटुंबीय सध्या चिंतेत आहेत. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट शेअर केलंय.

हा रॅपर मूळचा छत्रपती संभाजीनगरचा आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत मोठं बंड केलं आणि भाजपच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिंदे आणि चाळीस आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप विरोधकांकडून झाला. नंतर ’50 खोके, एकदम ओके’ हे वाक्य तर राज्याच्या राजकारणात चांगलंच गाजलं. त्यापाठोपाठ राज मुंगासे याचं ’50 खोके घेऊन चोर आले, चोर आले पाहा ओके होऊन’ हे रॅप सॉंगही प्रचंड गाजलं. हे गाणं इतकं व्हायरल झालं की विरोधकांनी ही गाण्याची दखल घेतली. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज मुंगासे याचं रॅप साँग आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केलं होतं, यावर लय भारी अशी कमेंटही केली होती. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही हा व्हिडिओ ट्विट करत कलाकराला सलाम असं म्हटलं होतं.

- Advertisement -

परंतू त्यानंतर शिंदे गटाच्या युवासेना कोअर कमिटीच्या सदस्य असलेल्या स्नेहल कांबळे यांनी या रॅपविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून मुंगासे याच्याविरोधात अंबरनाथमध्ये बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सरकार विरुद्ध बदनामीकारक रॅप केलं असल्याचा आरोप कांबळे यांनी तक्रारीत केला आहे. या तक्रारी वरून रॅपर राज मुंगासे या तरूणाला पोलिसांनी अटक केल्याचे सांगण्यात आलं. मात्र या तरूणाला कोणत्या पोलिसांनी कोठून अटक केली याची माहिती त्यांच्या कुटुंबाला मिळत नाही.

अखेर या कुटुंबाने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ही माहिती दिली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी यावर एक ट्वीट शेअर केलंय. “राज मुंगासे हा रॅपर ज्या दिवसापासून त्याचे गाणे सोशल मीडियावर आले, त्याच्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये आली. पण, तो कुठे आहे? कोणत्या पोलीस स्टेशनला आहे? हे मात्र त्याच्या घरच्यांना माहीत नाही. घरच्यांनी मला निरोप पाठवला असून त्यामध्ये त्यांच्या मनातील भिती स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी. त्वरीत त्याचे शोधकार्य करावं आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणाऱ्या राज मुंगासेच्या कुटुंबियांना माहिती द्यावी. त्याचे कुटुंबीय दुःखात आहे.” असं या ट्वीटमध्ये लिहिलंय.

- Advertisement -

या ट्वीटसोबतच राज याच्या कुटुंबीयांनी जितेंद्र आव्हाड यांना पाठवलेल्या एका मेसेजचा फोटो सुद्धा जोडलाय. “साहेब माझ्या भावाचं काहीच कळत नाहीये. त्याला अटक झालीये म्हणून सांगत आहेत. पण कुठल्या पोलीस ठाण्यात आहे व कुठून अटक केली आहे? काहीच कळत नाही. MIDC वाळूज पोलीस स्टेशनला Missing दाखल करायला गेलो. तर आमची तक्रार पण दाखल करून घेत नाहीत. म्हणतात की मुंबईला अटक असेल, मुंबईला कॉल केला तर म्हणतात की संभाजीनगरलाच अटक आहे. भाऊ अटक आहे पण नेमका कुठे काही कळत नाही. त्याचं काही बरं वाईट झालं की काय? घरचे टेन्शन घेत आहेत. आम्ही पण सगळीकडे शोध घेतोय. साहेब माझा भाऊ नेमकी आहे तरी कुठे. एव्हढं कळवा ही विनंती.”, अशा आशयाचा हा संदेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -