घरमुंबईउद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना...; शरद पवारांचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना…; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Subscribe

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना कोणतीच कल्पना दिली नाही, त्यांनी सहकारी पक्षांना विचारात घ्यायला हवे होते,” असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना एबीपी माझाला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत केला आहे. या मुलाखतीत त्यांनी जेपीसी, पहाटेचा शपथविधी, फडतूस-काडतूस शब्दावरुन रंगलेले राजकारण यासह विविध मुद्द्यांवर भाष्य करताना राजकीय नेत्यांचे कान टोचले आहेत.

शरद पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यात तिन्ही पक्षांचा सहभाग होता. तिन्ही पक्षांनी एकत्र येत संख्येची चाचपणी करून हा निर्णय घेतला होता. मात्र त्या संबंधित जर कोणी विचार करून दुसरा निर्णय घेत असेल आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असेल, तर तो त्यांचा अधिकार आहे. पण अन्य सहकारी पक्षांसोबत याबाबत चर्चा करणे आवश्यक होते. कारण चर्चा न करता निर्णय घेण्याचे भविष्यात दुष्परिणाम होतात. त्यावेळी चर्चा झाली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

जेपीसीला विरोध करणार नाही
यावेळी शरद पवार यांनी अदानी प्रकरणात जेपीसी मुद्द्यावर भाष्य केले तेव्हा त्यांचे सूर बदलल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सांगितले की, माझ्या मित्रांचे मत माझ्यापेक्षा वेगळे असल्यामुळे मी मविआमध्ये ऐक्य ठेवण्यासाठी माझे मत मांडले. पण माझ्या सहकाऱ्यांना वाटत असेल की जेपीसी पाहिजे, तर मी त्याला विरोध करणार नाही. याचा अर्थ मी त्यांच्या मताशी सहमत नाही, पण विरोधकांच्या ऐक्यावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी आम्ही आग्रह धरणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

फडतूस-काडतूसवरून पवारांनी नेत्यांचे टोचले कान
गेल्या काही दिवसांपासून राज्यात फडतूस-काडतूस शब्दावरुन राजकारण सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडतूस शब्द वापरल्यानंतर आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काडतूस शब्द वापरला, यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. परंतु फडतूस आणि काडतूस शब्दावरुन शरद पवार यांनी सर्वच राजकीय नेत्यांचे कान टोचले. वैयक्तिक टीकाटिप्पणी शक्यतो टाळा असे खडेबोल शरद पवार सर्वच राजकीय नेत्यांना सुनावले. ते म्हणाले की, मला महाराष्ट्राची संकृती माहिती आहे, जनतेची मानिसकता माहित आहे. त्यामुळे वैयक्तिक हल्ला करण्यापेक्षा राजकीय विषय, लोकांच्या विषयावर आक्रमक व्हा. परंतु वैयक्तिक हल्ला, चिखलफेक ही स्थिती शक्यतो टाळा. हे टाळण्याचं काम जाणीवपूर्व सर्वच राजकारणांनी केले पाहिजे, असे शरद पवार यावेळी सांगितले.

- Advertisement -

कोण कशी भूमिका घेईल सांगता येत नाही
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि जनतेकडून आजही पहाटेच्या शपथविधीची चर्चा होताना दिसते. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीमुळे महाराष्ट्र राज्यात भूकंप आला होता. या पहाटेच्या शपथविधीसंदर्भात एबीपी माझाने शरद पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, कोण कशी भूमिका घेईल, हे सांगता येत नाही. पण आज तीन पक्ष एकत्र आहेत आणि या पक्षाच्या सहकाऱ्यांची एकत्रित काम करण्याची मानसिकता आहे. ही मानसिकता सोडून कोणी वेगळं होण्याचा निर्णय घेतला तर तो त्यांचा एकट्याचा निर्णय असेल, तिन्ही पक्षांचा असणार नाही, असे शरद पवार यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत आपले मत मांडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -