घरमहाराष्ट्रसरकारी नोकर भरतीवरील निर्बंध हटविले; सरळसेवा कोट्यातील 75 हजार रिक्त पदे भरणार

सरकारी नोकर भरतीवरील निर्बंध हटविले; सरळसेवा कोट्यातील 75 हजार रिक्त पदे भरणार

Subscribe

हीच रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडून आदेश काढण्यात आला आहे.

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून या सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. अशातच शिंदे – फडणवीस सरकारने राज्यात 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती त्यासंदर्भात ठोस पावलं सुद्धा उचललाली आहेत. यापूर्वी सरकारनी नोकर भारावतीवर जे निर्बंध होते ते निर्बंध आता सरकारने हटविले आहेत. राज्यासह देशभरातच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवी वर्षात सरळसेवा केट्यातील 75 हजार रिक्त पदे भरणायचा सरकारचा मानस आहे. हीच रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडून आदेश काढण्यात आला आहे. ज्या विभागांचा नि कार्यलयांचा सुधारित आकृतिबंध अंतिम झाला आहे. अशा ठिकाणी सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मुभा दिली आहे. (Removed restrictions on recruitment of government servants; Direct service will fill 75 thousand vacancies in the quota)

 

- Advertisement -

100 टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा

30 सप्टेंबरच्या शासनाने निर्णय दिल्या नुसार सुधारित आकृतिबंध निश्चित झालेल्या विभागांना एमपीएससी कक्षेतील १०० टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली होती. अन्य संवर्गातील रिक्त पदांच्या 50 टक्के पदे भरण्याची मुभा देण्यात आली होती.

- Advertisement -

या विभागांना देण्यात आली परवानगी

ज्या विभागांचा सुधारित आकृतिबंध अजुनही अंतिम झालेला नाही, अशा विभागांमधील गट अ, गट ब, गट क मधील (वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे.

मर्यादित काळासाठी शिथिलता

नोकर भरतीवरील निर्बंधांतून शिथिलता देण्यात आली आहे केवळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू राहील. त्यापुढील भरतीची प्रक्रिया वित्त विभागाच्या 30 सप्टेंबर 2022 ला देण्यात आलेल्या आदेशानुसार करण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.


हे ही वाचा – मुंबईत १ नोव्हेंबरपासून दहा दिवस १० टक्के पाणीकपात

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -