घरमहाराष्ट्रवाहतूक व्यावसायिकांवर खासगी बँकांची दादागिरी; मनसेने दिला इशारा

वाहतूक व्यावसायिकांवर खासगी बँकांची दादागिरी; मनसेने दिला इशारा

Subscribe

वाहतूक व्यावसायिकांच्या तक्रारीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना पत्र लिहिलं.

लोन मोरेटोरियमचा अवधी संपल्यानंतर खासगी बँका आणि वित्तीय संस्थांनी वाहतूक व्यावसायिकांकडून कर्ज वसुली सुरु केली आहे. मात्र, खासगी बँका आणि वित्तीय संस्था दडपशाहीपणे, निष्ठूरपणे वाहतूक व्यावसायिकांचं आर्थिक शोषण करत असल्याचं मनसेने दावा केला आहे. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना पत्र लिहिले आहे. आर्थिक आव्हानांच्या आजच्या काळात कर्ज वसुली करताना बँका, एनबीएफसी, पतसंस्था आदी सर्व वित्तीय संस्थांनी कायदेशीर प्रक्रियेचं पालन करावं आणि आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झालेल्या वाहतूक व्यावसायिकांना आर्थिक दिलासा द्यावा आणि आरबीआयने खासगी बँका आणि वित्तीय संस्थांवर वचक ठेवावा, अशी विनंती राज ठाकरे यांनी शक्तीकांत दास यांना केली आहे.

खासगी बँका आणि वित्तीय संस्थांच्या कर्ज वसुलीच्या पद्धतीने हैराण झालेल्या वाहतूक व्यावसायिकांनी मनसेकडे तक्रारी केल्या होत्या. वाहतूक व्यावसायिकांच्या तक्रारीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना पत्र लिहिलं. याबाबतची माहिती देण्यासाठी मनसेचे सरचिटणीस संजय नाईक यांनी पत्रकार परिषद घेत दिली. यावेळी त्यांनी वाहतूक व्यावसायिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी एक टोलफ्री क्मांक जारी केला होता, त्यावर २ हजार ८३४ तक्ररी आल्याचं सांगितलं. खआसगी बँका आणि वित्तीय संस्था यांनी दडपशाहीपणे कर्ज वसुली करणं थांबवावं अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला.

- Advertisement -

खासगी बँका आणि वित्तीय संस्थांची जी गुंडशाही सुरु आहे, त्याविरोधात राज ठाकरे यांचं पत्र गव्हर्नर शक्तीकांत दास यांना दिलं आहे. यासोबतच आमच्याकडे खासगी बँका आणि वित्तीय संस्था यांच्या दडपशाहीबद्दल जे काही पुरावे होते ते सर्व शक्तीकांत दास यांना दिले आहेत, अशी माहिती संजय नाईक यांनी दिली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -