घरमहाराष्ट्र'त्याने' ईव्हीएमवर शाई फेकून केला निषेध; पोलिसांकडून कारवाई

‘त्याने’ ईव्हीएमवर शाई फेकून केला निषेध; पोलिसांकडून कारवाई

Subscribe

'लोकशाहीसाठी ईव्हीएम मशीन घातक असून निवडणूक प्रक्रियेत मतदानासाठी ईव्हीएम मशीन बंद करण्यात यावी"

आज संपुर्ण महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक होत असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ४४.७८ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान ठाणे शहर विधानसभा मतदार संघात अनेक ठिकाणी असलेल्या मतदार केंद्रावर शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडत होती. मात्र सिव्हील रूग्णालयाजवळ असणाऱ्या एका केंद्रावर ईव्हीएम मशीनवर शाई फेकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

असा आहे प्रकार

शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत असताना ठाण्यात ईव्हीएमवर शाई फेकण्याचा प्रकार सिव्हील रूग्णालयाजवळ असणाऱ्या एका केंद्रावर घडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे मतदान करण्यास आलेल्या मतदारांचा साधारण २५ मिनिटे चांगलाच खोळंबा झाला आहे. ईव्हीएम मशीनवर शाई फेकणारा व्यक्ती ठाण्यातीस बहुजन नेता असून त्याचे नाव सुनील खांबे असे आहे. सुनील खांबेंनी या केंद्रावर मतदान केल्यानंतर बाहेर न पडता मतदान कर्मचाऱ्यांजवळ असलेली शाईची बॉटल हिसकावत ईव्हीएमवर फेकली. यावेळी मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला. खांबे यांनी शाई फेकत ‘ईव्हीएम मुर्दाबाद’च्या घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली.

- Advertisement -

या प्रकारानंतर घटनास्थळी तैनात असलेल्या काही पोलिसांनी तात्काळ सुनिल खांबे यांना ताब्यात घेऊन मतदान केंद्राच्या बाहेर काढले. हा संपुर्ण गोंधळ साधारण २० ते २५ मिनिटे सुरू होता. यामुळे मतदानकेंद्रावर उपस्थित असलेल्या इतर मतदारांचा चांगला खोळंबा झाला मात्र नंतर ही प्रक्रिया सुरळीतरित्या पुन्हा सुरु झाली.

- Advertisement -

याकरिता सुनील खांबेनी ईव्हीएमवर शाई फेकून केला निषेध

लोकशाहीसाठी ईव्हीएम मशीन घातक असून निवडणूक प्रक्रियेत मतदानासाठी ईव्हीएम मशीन बंद करण्यात यावी, अशी मागणी करत हा प्रकार घडवून आणला. निषेधार्थ घोषणाबाजी करणाऱ्या सुनील तांबेंना नगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या मतदान केंद्रावरील अधिकारी यांच्या सुचनेवरून कारवाई करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -