घरमहाराष्ट्रनाशिकदोन्ही हात नसूनही शेतकऱ्याचं मतदान

दोन्ही हात नसूनही शेतकऱ्याचं मतदान

Subscribe

मतदानानिमित्तानं मिळालेल्या सुट्टीच्या दिवशी मतदान न करता बाहेर फिरायला जाणाऱ्या किंवा मतदान का केलं नाही? यावर विविध कारणं सांगणाऱ्या मतदारांना बाजीराव यांनी आपल्या कृतीतून चपराक दिली आहे.

एका शेतकऱ्यानं दोन्ही हात नसतानाही आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. या शेतकऱ्याचं नाव बाजीराव मोजाड असं आहे. मतदानानिमित्तानं मिळालेल्या सुट्टीच्या दिवशी मतदान न करता बाहेर फिरायला जाणाऱ्या किंवा मतदान का केलं नाही? यावर विविध कारणं सांगणाऱ्या मतदारांना बाजीराव यांनी आपल्या कृतीतून चपराक दिली आहे. त्यामुळे अनेक स्तरावर बाजीराव यांचे कौतुक केलं जात आहे. दरम्यान, बाजीराव यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांना दोन्ही हात नसल्यामुळे त्यांच्या पायावरील बोटावर शाई लावण्यात आली.

देवळाली कॅम्प येथे बजावला मतदानाचा हक्क

बाजीराव मोजाड हे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी नाशिकच्या देवळाली कॅम्प येथं आपल्या मतदानाचा हक्क बजावला. २००८ साली शेतात काम करत असताना एका अपघातात त्यांनी आपले दोन्ही हात गमावले होते. मात्र, तरीही त्यांनी कोणतेही कारण न देता मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मतदानासाठी काहीपण! ट्रॅक्टरची ट्रॉली जोडून मतदारांसाठी पाण्यात बनला पूल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -