घरदेश-विदेशबापाने स्वतःसहीत कुटुंबाला जाळून घेतले; सुदैवाने पत्नी वाचली

बापाने स्वतःसहीत कुटुंबाला जाळून घेतले; सुदैवाने पत्नी वाचली

Subscribe

बंगळुरूमध्ये घरगुती वादातून पित्याने स्वतःसह कुटुंबियांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

बंगळुरु येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरगुती वादातून एकाने स्वतःसह आपल्या कुटुंबीयांना पेट्रोल ओतून आग लावत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत वडीलांसह तिघांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत मुरली (५०), त्यांची मुलगी कावेरी (२१) आणि मुलगा श्रीकांत (१३) मृत्यूमुखी पडले. तर मृत मुरली यांची पत्नी गीता गंभीर जखमी झाली आहे.

सिनीअर पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मुरली यांच्या घराला आग लागल्याची घटना त्यांच्या शेजाऱ्यांच्या निदर्शनास आली. शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांसह आपत्कालीन सेवेला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थली दाखल झाले. या घटनेत मुरलीची दोन्ही मुलं जागीच ठार झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मुरली आणि त्यांची पत्नी गीता यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान मुरली यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

प्राथमिक माहितीनुसार, घरगुती भांडणातून मुरली यांनी स्वतःसह पत्नी आणि मुलांना पेट्रोल ओतून आग लावली. या घटनेत त्यांची पत्नी गीता गंभीर जखमी झाली. त्यामुळे पोलिसांना तिचा जबाब लिहून घेता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -