घरमहाराष्ट्रReservation issue : आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार सगळ्यांनाच बनवतेय; जयंत पाटलांचा टोला

Reservation issue : आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार सगळ्यांनाच बनवतेय; जयंत पाटलांचा टोला

Subscribe

बुधवारी (29 नोव्हेंबर) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मंत्रिमंडळातील छगन भुजबळ जी विधान करतायेत ते आश्चर्यकारक आहे.

मुंबई : राज्यात सध्या आरक्षणाच्या भोवती राजकारण फिरत असून, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद रंगत आहे. यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. यावर भाष्य करताना राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका करत सरकार सगळ्यानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून बनवत असल्याचे म्हणत राज्य सरकारला टोला लगावला आहे. (Reservation issue The government is making everyone on the issue of reservation Jayant Patials gang)

बुधवारी (29 नोव्हेंबर) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मंत्रिमंडळातील छगन भुजबळ जी विधान करतायेत ते आश्चर्यकारक आहे. त्यावरून सरकारची भूमिका काय आहे हे स्पष्ट करावे, सरकार सगळ्यांनाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून बनवण्याचं काम करत आहे. एका बाजूने OBC समाजासाठी त्यांच्या मंत्रिमंडळातीलच नेते जाऊन OBC समाजाच्या व्यासपीठावर भूमिका मांडतायेत, तर राज्याचे मुख्यमंत्री वेगळी भूमिका मांडतायेत. हे सगळे मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसणारे सगळे नेते आहेत. आणि यांच्यात एकवाक्यता नाही हे दिसून येते. हे दोन्ही वातावरण बिघडवण्याचं जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं आणि एकमेकाच्याबद्दल द्वेष निर्माण करण्याचं काम हे राज्य सरकारच्याकडून होतंय आणि त्याला प्रोत्साहन राज्य सरकारकडून मिळतंय असं आम्हाला वाटते असेसुद्धा यावेळी जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : NCP : राष्ट्रवादीचं ठरलं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आक्रोश मोर्चा

एकीकडे आश्वासन तर दुसरीकडे राज्यभर सभा

पुढे बोसताना जयंत पाटील म्हणाले की, सध्याची राज्यातील परिस्थिती आम्ही फक्त हे पाहतोय. कारण सरकारने याच्यावर निर्णय घ्यायचा आहे. सरकार मराठा समाजाला कसं आरक्षण देणार? हे स्पष्ट सांगितलं पाहिजे. दुसऱ्या बाजूनी OBC समाजाची भूमिका मंत्रिमंडळातलीच दुसरे मंत्री मांडतायेत. मग OBC समाजाच्या भूमिका मांडणाऱ्यांबद्दल माझी तक्रार नाही आहे. शेवटी त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे, पण मंत्रिमंडळात जे एकत्रित बसतात, त्यांनी एक मुखाने बाहेर बोलायचं असतं, मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला मोठं आश्वासन द्यायचं आणि ज्येष्ठ मंत्र्यांनी दुसऱ्या बाजूने राज्यभर सभा घ्यायच्या आणि वेगळी भूमिका मांडायची आणि दोन उपमुख्यमंत्री जे आहेत ते याच्यावर काहीच बोलत नाहीत. म्हणजे हे एकत्रित बसून ठरवून दोन व्यासपीठं महाराष्ट्रात तयार केलेली आहेत का काय? आणि दोन्ही बाजूची फसगत करायची आणि महाराष्ट्राची राजकारणाची दीशा बदलायचा पुढच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत असा प्रयत्न याच्यात दिसतोय असा आरोपसुद्धा यावेळी जयंत पाटील यांनी यावेळी केला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -