घरमहाराष्ट्रनेरळ बस स्थानक रस्त्याची दुरवस्था

नेरळ बस स्थानक रस्त्याची दुरवस्था

Subscribe

रिक्षा संघटना आंदोलन करणार

कर्जत एसटी आगाराच्या महत्त्वाच्या येथील स्थानकात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. केवळ माती उरली असल्यामुळे धुळीचे लोट रस्त्यावरून चालताना तोंडावर उडत आहेत. एसटी स्थानकासह सरकारी दवाखाना आणि रेल्वे स्थानकाकडे जाण्याचाही हाच रस्ता आहे. त्याकडे पाहायला संबंधित यंत्रणांना वेळ नसल्याने स्थानिक पातळीवरील सर्व रिक्षा संघटना आंदोलन करण्या20च्या तयारीत आहेत.

एसटी स्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रेल्वे स्थानकात पोहचण्यासाठी नेरळ-कळंब रस्त्यावरून या रस्त्याचा वापर केला जातो. या 500 मीटर लांबीच्या रस्त्यावर गेल्या 13 वर्षांत एकदाही डांबर टाकण्याची तसदी रायगड जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नेरळ विकास प्राधिकरण यांनी घेतली नाही. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्यावर पूर्वी सुरक्षा भिंत आणि लहान साकव बांधण्यात आला आहे. रहदारीच्या रस्त्यावर किमान पाच वर्षांनी डांबरीकरण होणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रिक्षा संघटना याबाबत आवाज उठवत आहे. पण स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्यापर्यंत हा आवाज पोहचत नाही.

- Advertisement -

दोनवेळा रस्त्यासाठी आंदोलने केली, परंतु केवळ आश्वासने मिळाली आहेत. त्यामुळे आता यापुढे होणारे आंदोलन आरपारची लढाई असेल हे संबंधित अधिकार्‍यांनी समजून जावे.
-विजय हजारे, अध्यक्ष, रिक्षा संघटना

एसटी बस स्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यासाठी आम्ही नेरळ विकास प्राधिकरणामधून निधी मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. तसा प्रस्ताव सादर असून मंजुरीच्या प्रतिक्षेत आहोत.
-एस.गोपणे, प्रभारी उप अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -