घरमहाराष्ट्रRohit Pawar vs Tatkare : मी पुराव्यासह बोलतो आणि..., रोहित पवारांचा तटकरेंना...

Rohit Pawar vs Tatkare : मी पुराव्यासह बोलतो आणि…, रोहित पवारांचा तटकरेंना थेट इशारा

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. सुनील तटकरे यांच्यावर आऱोप करत, मी पुराव्यासह बोलतो, असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

या लोकसभा निवडणुकीत राज्यातील बहुतांश ठिकाणी सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटांमध्ये जोरदार शब्दरण रंगले आहे. बालबुद्धीच्या तसेच राजकारणात अगदी नवख्या असलेल्या व्यक्तीवर फारसे बोलायचे नाही, असे सांगत सुनील तटकरे यांनी, 2019मध्ये रोहित पवार यांना भाजपाचे तिकीट हवे होते, असा दावा अलीकडेच केला होता.

- Advertisement -

रोहित पवार हे आपल्या वडिलांसह विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते आणि हडपसरमधून भाजपाचे तिकीट मिळविण्यासाठी त्यांनी फडणवीस यांना विनवण्या केल्या, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे तर. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने आमदारकीच्या राजीनाम्याची तयारी करून ते कोणाला कितीवेळा भेटले, याची आपल्याला माहिती असल्याचेही त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बालताना म्हटले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : आमच्यासमोर वाजपेयींचं उदाहरण; नाना पटोलेंचे धोत्रेंवरून बावनकुळेंना प्रत्युत्तर

त्याला आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुनील तटकरे यांच्यासारखा, केंद्रीय यंत्रणांना घाबरून अटकेपासून सुटकेची भीक मागणारा आणि विचारांशी गद्दारी करणारा मी नाही. भाजपामध्ये जायचे असते तर आज केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी आपल्याप्रमाणे भाजपाची आरती गात बसलो असतो, असे सांगतानाच, आता ज्याप्रमाणे दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून शरद पवार यांची साथ सोडली, त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून भाजपामध्ये अधिकृत प्रवेश कधी घेत आहात? तेवढं सांगा, असा टोला त्यांनी लगावला आहे.

तसेच, मी जे बोलतो ते पुराव्यासह बोलतो आणि अजूनही बोलायला भाग पाडले तर अनेकांना ते परवडणार नाही, असा इशाराही आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -