घरमहाराष्ट्रशक्ती विधेयकाला हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळेल - रुपाली चाकणकर

शक्ती विधेयकाला हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळेल – रुपाली चाकणकर

Subscribe

येत्या हिवाळी अधिवेशनात शक्ती विधेयकाला निश्चितपणे मंजुरी मिळेल, असा विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी व्यक्त केला आहे. राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबियांची बारामतीमध्ये भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून महाराष्ट्राने महिलांविषयक कायम सकारात्मक धोरणे राबवली आहेत. देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केलं आहे, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामाणिक राहिलं आणि पक्षाचं चांगलं काम केलं की त्याच फळ मिळतं. महिला आयोगाची जबाबदारी देऊन पक्षानं माझ्या संघटनेचा सन्मान केलाय, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, शक्ती विधेयकाच्या मंजुरीसाठी रुपाली चाकणकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही पत्र लिहलं आहे.

- Advertisement -

शक्ती कायद्यात काय आहेत तरतुदी

•  या कायद्यानुसार २१ दिवसात खटल्याचा निकाल लागणार

- Advertisement -

•  आरोपीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार

•  अती दुर्लभ प्रकरणात फाशीच्या शिक्षेची तरतूद, अथवा जन्मठेप आणि दंड

• ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. वय वर्ष १६ पेक्षा कमी असलेल्या मुलींवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत जन्मठेप

•  महिलांवरील क्रूर अत्याचार गुन्ह्याप्रकरणी मृत्युदंड

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -