घरमनोरंजनअनिल कपूरच्या मुलाला फटाक्यांबाबत ट्विट करणे पडले महागात

अनिल कपूरच्या मुलाला फटाक्यांबाबत ट्विट करणे पडले महागात

Subscribe

दिवाळीमध्ये सगळीकडे धामधूम पाहायला मिळते. आकर्षक सजावट रोषणाईसह दिवाळीत फटाके फोडण्याची एक वेगळीच मजा असते. प्रत्येकाच्या लहानपणापासून दिवाळीच्या काही खास आठवणी असतात. कोरोनामुळे गेल्या काही काळापासून सर्वच सण काही निर्बंधात पार पडले मात्र यंदाची दिवाळी काही खास आहे. बॉलिवूडमध्येही मोठ्या जोष-उत्साहात दिवाळी सेलिब्रेशन पार पडते. तर दुसरीकडे अभिनेता अनिल कपूरचा मुलगा अभिनेता हर्षवर्धन कपूरला या खास दिवशी लोकांना प्रचंड ट्रोल केले. दिवाळीच्या दिवशी हर्षवर्धनने त्याच्या ट्विटर हँडलवर फटाक्यांबाबत केलेले ट्विट त्यांना चांगलेच महागात पडले. किंबहुना, फटाक्यांच्या आवाजाच्या भीतीने त्याने आपल्या पाळीव प्राण्यांबद्दल चिंता व्यक्त केली आणि लोकांना फटाके न जाळण्याचा सल्ला दिला.(Netizens Troll Hars hvardhan Kapoor)

- Advertisement -

हर्षवर्धनचे हे ट्विट व्हायरल होताच सोशल मीडियावर लोकांनी अभिनेत्याला जोरदार फटकारले. एका यूजरने अनिल कपूरचा जुना फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो त्याच्या संपूर्ण कुटुंबासह फटाके पेटवताना दिसत आहे. ते शेअर करताना यूजरने लिहिले की, ‘या फोटोमध्ये सोनमच्या डाव्या बाजूला उभे आहात का? फटाके फोडायला आणि इथे ज्ञान देण्यापासून तुमच्या वडिलांना थांबवले नाही.

- Advertisement -

हर्षवर्धन कपूरने २०१६ मध्ये ‘मिर्झा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. हर्षवर्धनला त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला आहे.


हे हि वाचा –  Katrina Kaif: कॅटरीना कैफने केली चेहऱ्यावर शस्त्रक्रिया ?

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -