घरमहाराष्ट्रअजितदादांसमोरच मोदींची शरद पवारांवर टीका; म्हणाले- 'त्यांनी' शेतकऱ्यांसाठी काय केले?

अजितदादांसमोरच मोदींची शरद पवारांवर टीका; म्हणाले- ‘त्यांनी’ शेतकऱ्यांसाठी काय केले?

Subscribe

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मागील वर्षांपासून आम्ही इमानदारीने शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहोत.

शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (26 ऑक्टोबर) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. या दौऱ्यात मोदी 86 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अतंर्गत लाभ दिला. सोबतच निळवंडे धरणाचे जलपूजन करून राज्यात कालव्याचे जाळे पसरवले. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांसमोरच शरद पवारांवर हल्ला केला. (Modi criticizes Sharad Pawar in front of Ajit Dada Said  what did they do for the farmers)

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मागील वर्षांपासून आम्ही इमानदारीने शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केले आहे. महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते जे की, केंद्र सरकारमध्ये खूप वर्षं केंद्रीय कृषीमंत्री होते. त्यांचा मी वैयक्तिरित्या खूप आदर करतो. पण मी विचारतो की त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांना साडेतीन लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केले. आम्ही त्याच कालावधीत साडेतेरा लाख कोटी एमएसपीवर खर्च केले. शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचे काम केल असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.

- Advertisement -

2014 च्या आधी देशात कडधान्य-तेलबिया पिकांची खरेदी फक्त 500 ते 600 कोटी रुपयांची होत होती. परंतू आमचे सरकार आल्यानंतर आम्ही कडधान्य आणि तेलबियांची खरेदी एमएसपीवर खरेदी करून 1 लाख 15 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले. परंतू जेव्हा ते कृषिमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी दलालांच्या भरवशावर रहावे लागत होते. असे म्हणत त्यांनी थेट शरद पवार यांच्यावर नाव न घेता हल्ला केला.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नुकतीच रब्बी पिकांसाठी एमएसपी जाहीर करण्यात आला आहे. हरभऱ्याच्या एमएसपीमध्ये 150 रुपयांनी, गहू आणि करडईच्या एमएसपीमध्ये 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील आपल्या शेतकऱ्याना होईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचीही आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत. उसाचा भाव 315 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. गेल्या नऊ वर्षांत सुमारे 70 हजार कोटी रुपयांचे इथेनॉल खरेदी करण्यात आले आहे. हा पैसा ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळावेत यासाठी साखर कारखाने आणि सहकारी संस्थांना कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा : भावी पिढी महाराष्ट्रात दुष्काळ बघणार नाही; फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

- Advertisement -

सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी प्रयत्न

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमचे सरकार सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी काम करत आहे. देशभरात दोन लाखांहून अधिक सहकारी संस्था स्थापन होत आहेत. देशातील शेतकऱ्यांना साठवणुकीच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकारी संस्थाही उपयुक्त ठरल्या आहेत. शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यमातून लहान शेतकऱ्यांचे संघटन केले जात आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे आत्तापर्यंत देशभरात सात हजारांहून अधिक एफपीओव्ही तयार झाले आहेत अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते AC दर्शन रांगेचे लोकार्पण

महाराष्ट्राचा विकास म्हणजे देशाचा विकास

महाराष्ट्र हे अफाट क्षमता आणि अगणित शक्यतांचे केंद्र राहिले आहे. महाराष्ट्राचा विकास जितका जलद होईल, तितक्याच वेगाने भारताचा विकास होणार. काही दिवसांपूर्वी मला मुंबई आणि शिर्डीला जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवी झेंडी दाखविण्याचे सौभाग्य प्राप्त झाले होते. रेल्वेचे जाळे विकसीत करण्याचे प्रयत्न सतत सुरु आहेत. जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग सुरू करण्याचे काम सुरू आहे यामुळे मुंबई- हावडा रेल्वे मार्गावरही प्रवास सोपा होईल. त्याचप्रमाणे चौपदरी सोलापूर ते बोरगाव हा रस्ता खुला करण्यात येणार असून या बांधकामामुळे संपूर्ण कोकण विभागाचा संपर्क सुखकर होईल. यामुळे ऊस आणि द्राक्षे यांसारख्या उद्योगांना फायदा तर होईलच शिवाय कनेक्टिव्हिटीची प्रगती होऊन सामाजिक विकासाचा नवा मार्ग तयार होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -