घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राचं महत्व कमी होणार याचं सोयरसुतक नसणं हाच भाजपच्या महाराष्ट्रद्रोहाचा पुरावा -...

महाराष्ट्राचं महत्व कमी होणार याचं सोयरसुतक नसणं हाच भाजपच्या महाराष्ट्रद्रोहाचा पुरावा – सचिन सावंत

Subscribe

नागपूरमधील केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे मुख्यालय दिल्लीला नेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरुन महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रशासकीय कार्यालय दिल्लीत जात आहे आणि सबरिजनल कार्यालय हे नागपुरातच असेल असं म्हटलं. दरम्यान, यावर सचिन सावंत प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राचं महत्व कमी होणार याचं सोयरसुतक नसणं हाच भाजपच्या महाराष्ट्रद्रोहाचा पुरावा असल्याची घणाघाती टीका केली आहे.

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून महत्वाच्या संस्था महाराष्ट्रातातून दुस-या राज्यात नेण्यास सुरवात झाली आहे. आता नागपूरमधील केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे मुख्यालय दिल्लीला नेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यापूर्वी बीकेसीमधील आंतरराष्ट्रीय सेवा आर्थिक सेवा केंद्र गुजरातला नेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता, असं सचिन सावंत म्हणाले. त्यावर केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलं. ‘स्व. दत्तोपंत ठेंगडी नॅशनल बोर्ड फॉर वर्कर्स एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट’चे नागपूर येथील कार्यालय दिल्लीला नेण्यावरून काही लोकांच्या पोटात दुखते आहे आणि पुन्हा एकदा बुद्धीभेद केला जात आहे. मुळात येथील प्रशासकीय कार्यालय दिल्लीत जात आहे आणि सबरिजनल कार्यालय हे नागपुरातच असेल. या बोर्डच्या कामाचा विस्तार केल्याने प्रशासकीयदृष्ट्या सुविधा व्हावी, म्हणून दिल्लीत मुख्यालय असेल. बाकी नागपुरातील कार्यालयावर किंवा कामावर त्याचा परिणाम होणार नाही, असं केशव उपाध्ये म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, उपाध्ये यांच्या उत्तराला सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर देताना भाजपवर सडकून टीका केली. ६३ वर्षे महाराष्ट्रात असलेले CBWE चे मुख्यालय आकसापोटी मोदी सरकार दिल्लीला नेत असेल तर महाराष्ट्राचा अभिमान असल्याने आमच्या पोटात दुखणारच! मुख्यालयाऐवजी उपविभागीय कार्यालय झाल्याने महाराष्ट्राचे महत्व कमी होणार याचे सोयरसुतक नसणे हाच भाजपाच्या महाराष्ट्र द्रोहाचा पुरावा आहे, असं सचिन सावंत म्हणाले.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -