घरमहाराष्ट्र'पद्मश्री' नाना चुडासामा यांचं निधन

‘पद्मश्री’ नाना चुडासामा यांचं निधन

Subscribe

मुंबईचे माजी नगरपाल आणि ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासामा यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं आहे.

मुंबईचे माजी नगरपाल, ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्रीनाना चुडासामा यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं होतं. मुंबईतल्या चर्चगेटमधल्या राहत्या घरीचं त्यांच आज निधन झाले आहे. नाना चुडासामा हे भाजपच्या नेत्या आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर शायना एनसी यांचे वडील होते.

नाना चुडासामा यांचे मुंबईच्या विकासासाठी भरीव योगदान

नाना चुडासामा यांनी मुंबई माझी लाडकी, फोरम अगेन्स्ट ड्रग्ज अॅण्ड एड्स, नॅशनल किडनी फाऊंडेसन, कॉमन मेन्स फोरम अशा निरनिराळ्या संस्थांच्या माध्यामतून त्यांनी सामाजिक कार्य केलं आहे. २००५ साली त्यांनी केलेल्या सामजाकार्यासाठी सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होत. तसेच देश – विदेशातील घटनेवर मार्मिक टिप्पणी करणाऱ्या मरिन ड्राइव्हवरील बॅनरमुळे त्यांनी एक वेगळी ओळख होती.

- Advertisement -

चुडासामा यांच्या निधनावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. चुडासामा यांनी हरित मुंबई आणि स्वच्छ मुंबईसाठी त्यांनी विशेष योगदान देतानाच त्यांनी आय लव्ह मुंबईया मोहिमेच्या माध्यामतून वृक्षरोपणाचंही काम केलं असं सांगतानाच चुडासामा यांच्या रुपानं आपण मुंबईच्या विकासाची तळमळ असलेला दक्ष मुंबईकरगमावल्याची भावना राज्यपालांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -