घरCORONA UPDATEसरकारला झालाय कोरोना, सर्व मंत्री क्वारंटाईन; सदाभाऊ खोत यांची टीका

सरकारला झालाय कोरोना, सर्व मंत्री क्वारंटाईन; सदाभाऊ खोत यांची टीका

Subscribe

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे सरकार कोरोनाग्रस्त झाले असून तिरडीवर झोपले आहे. तर सरकारमधील सर्व मंत्री क्वारंटाईन झालेले आहेत, अशी टीका त्यांनी केली. लॉकडाऊन आणि त्यानंतर आलेल्या नैसर्गिक आपत्तींपुढे शेतकरी हतबल झाला असून सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर दिसत नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना दूधाचा दर कमी मिळत आहे. शेतकरी संघटनांकडून याबाबत वारंवार विचारणा केली जात आहे. मात्र शासन स्तरावर काही निर्णय होताना दिसत नाही. सरकार दूध उत्पादकांना लुटणारंच असेल तर आम्ही फुकट दूध द्यायला तयार आहोत. सरकारने येऊन घेऊन जावे. पण जर सरकार जागे झाले नाही तर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरेल, असा इशाराही खोत यांनी दिला.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना खोत म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील शेतकरी उध्वस्त झाले आहेत. उर्वरीत महाराष्ट्रात ज्या शेतकऱ्यांनी सोयाबिनची पेरणी केली, त्यात बियाणे बोगस निघाल्यामुळे पिक उगवले नाही. शेतकऱ्यांसाठी जी व्यवस्था सरकारने उभी करायला हवी, ती उभी केलेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनाही शेतकऱ्यांच्या समस्येशी काही देणेघेणे नाही, असेही खोत यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -