घरमनोरंजनPhoto : 'या' अभिनेत्रींच्या सौंदर्याचे रहस्य; होम फेसपॅक!

Photo : ‘या’ अभिनेत्रींच्या सौंदर्याचे रहस्य; होम फेसपॅक!

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री आपल्या सौंदर्याची खास काळजी घेतात. त्यांच्या सर्व ब्युटी प्रोडक्ट्स या परदेशातील मोठमोठ्या ब्रँडच्या असतात. त्यांच्या नितळ, सुंदर, गोऱ्यापान त्वचेचे रहस्य गेल्या काही महिन्यांमध्ये समोर आले आहे. लॉकडाऊनमध्ये घरी असलेल्या या बॉलीवूड अभिनेत्रींनी घरच्या घरीच फेसपॅक लावून आपापले फोटो त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसमोर आणले आहेत. या अभिनेत्रीदेखील फेसपॅक लावून सोशल मीडियासमोर येऊ शकतात, असे त्यांनी दाखवून दिले. यामध्ये करिष्मा कपूर, करिना कपूर, हुमा खुरेशी, अनन्या पांडे, दीपिका पदुकोण आणि सोनम कपूर या अभिनेत्रींचा समावेश आहे.

  • करिना कपूर तिच्या फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या सौंदर्यापेक्षा अॅटिट्युडचे चाहते जास्त आहेत.
करिना कपूर
  • अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्याची आघाडीची अभिनेत्री असून तिच्या सौंदर्याचे लाखो दीवाने आहेत. नुकतेच तिने सिल्व्हर फेसपॅक लावलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
दीपिका पदुकोण
  • अभिनेत्री हुमा खुरेशी हिनेदेखील घरगुती फेसपॅक लावलेला फोटो नुकताच प्रसिद्ध केला होता.
हुमा खुरेशी
  • अभिनेत्री सोनम कपूर लुक्स आणि फॅशनच्या बाबतीत खुपच चोखंदळ असल्याचे तिने अनेकदा माध्यमांसमोर म्हटले आहे. तिच्या फेसपॅकचे फोटोही चाहत्यांनी पाहिले आहेत.
सोनम कपूर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -