घरताज्या घडामोडी'सत्यमेव जयते', नवाब मलिकांच्या आरोपावर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

‘सत्यमेव जयते’, नवाब मलिकांच्या आरोपावर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

Subscribe

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आरोप केले आहेत. एनसीबीचे आणि भाजपचे कनेक्शन नवाब मलिक यांनी समोर आणले होते यानंतर आता एनसीबीच्या पंचांवरच मलिकांनी आरोप केला आहे. लेडी डॉन आणि फ्लेचर पटेल हे नेहमी एनसीबीचे पंच कसे असू शकतात असे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. मलिकांनी टीकेची मालिका सुरुच ठेवली आहे. यावर एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांनी सत्यमेव जयते आणि माझ्या शुभेच्छा असे म्हटलं आहे. नवाब मलिकांच्या आरोपांवर फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन म्हणून उल्लेख करणाऱ्या यास्मिन वानखेडे यांनी देखील नवाब मलिकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वानखेडेंना नवाब मलिकांच्या आरोपांबाबत प्रश्न विचारण्यात आला असता माझ्या त्यांना शुभेच्छा सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली आहे. वानखेडेंनी नवाब मलिकांच्या जावयाच्या प्रकरणातही अधिक बोलणं टाळत प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगितले होते. फ्लेचर पटेल पंच कसे? तसेच फॅमिली फ्रेंडला पंच म्हणून कसं काय घेतलं? असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

नवाब मलिकांचा आरोप काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी आणि भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. एनसीबीमधील अधिकाऱ्यांचे भाजप कनेक्शन उघडकीस आणल्यानंतर आता मलिकांनी एनसीबीचे पंच असणाऱ्या फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. फ्लेचर पटेल कोण आहे? तसेच फ्लेचर पटेलचा भाजपशी काय संबंध आहे याबाबत एनसीबीने खुलासा करावा असे नवाब मलिकांनी म्हटलं आहे. फ्लेचर पटेल एका फोटोत My Lady Don सोबत दिसत आहे. ही लेडी डॉन कोण आहे ? असाही सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

फ्लेचर पटेल, लेडी डॉनचे मलिकांना प्रत्युत्तर

कारगिल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा गौरव करण्यात आला होता. समीर वानखेडे चांगले अधिकारी आहेत. ते चांगले काम करत आहेत. माजी सैनिकांचे कर्तव्य आहे की, महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करणे आणि समीर वानखेडे सारख्या अधिकाऱ्यांना मदत करणे. तसेच मी संघटनेतर्फे वानखेडेंना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे फ्लेचर पटेल यांनी म्हटलं आहे. तर लेडी डॉन असा उल्लेख असलेल्या समीर वानखेडे यांच्या मोठ्या बहिण आहेत. त्यांचे नाव यास्मिन वानखेडे असून त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. नवाब मलिकांवर कायदेशीर कारवाई करुन अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे लेडी डॉन यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Cruise Drug Bust : फ्लेचर पटेलचे भाजपशी कनेक्शन काय ? नवाब मलिकांचा सवाल


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -