घरताज्या घडामोडीManmohan Singh Health Update: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना डेंग्यूची लागण

Manmohan Singh Health Update: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना डेंग्यूची लागण

Subscribe

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. याबाबतची माहिती दिल्लीच्या एम्स रुग्णातील अधिकाऱ्यांना शनिवारी दिली आहे. ८९ वर्षीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ताप आल्यानंतर कमकुवतपणा आल्यामुळे बुधवारी (दिनांक १३ ऑगस्ट) दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)मध्ये दाखल केले होते.

आज, शनिवारी मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना एम्सचे एक अधिकारी म्हणाले की, ‘त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. परंतु त्यांच्या प्लेटलेट्सची संख्या वाढत आहे आणि त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.’ सिंग यांना रुग्णालयातील कार्डियो-न्यूरो सेंटर जवळील वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर नितीश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये हृदयरोग तज्ज्ञांच्या एका टीमच्या देखरेखीखाली सिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी गुरुवारी मनमोहन सिंग यांची भेट घेऊन त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली. एम्समध्ये मंडाविया यांच्या भेटीनंतर एक वाद निर्माण झाला. माजी पंतप्रधान यांचा भेटीदरम्यान एक फोटोग्राफरला मंडाविया आपल्यासोबत घेऊन गेले होते.

मनमोहन सिंग यांची मुलगी दमन सिंग यांनी कुटुंबियांच्या परवानगी शिवाय फोटोग्राफर घेऊन जाण्यासाठी मंडावियांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दमन सिंग म्हणाल्या की, ‘त्यांची आई खूप अस्वस्थ झाल्या आहेत. कारण एक फोटोग्राफर केंद्रीय मंत्र्यांसोबत खोलीत घुसला होता. परंतु जेव्हा त्यांच्या आईने मोठ्याने फोटोग्राफर खोलीच्या बाहेर जा सांगितले होते, तेव्हा त्याने पूर्णपणे दुर्लक्ष केले. यामुळे ती खूपच अस्वस्थ असून माझे आई-वडील कठीण परिस्थितीसोबत सामना करत आहे. ते वृद्ध आहेत आणि प्राणीसंग्रहालयातील कोणत्याही प्राण्यासारखे नाहीत.’

- Advertisement -

हेही वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; पंपोर LeTचे ३ दहशतवादी ठार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -