घरमहाराष्ट्रनाशिकसायखेड्यात जिल्हा बँक फोडली; रोकड लांबवण्याचा प्रयत्न मात्र फसला

सायखेड्यात जिल्हा बँक फोडली; रोकड लांबवण्याचा प्रयत्न मात्र फसला

Subscribe

सीसीटीव्ही यंत्रणा आणि अलार्म बंद असल्याचे आले समोर

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फोडल्याचा प्रकार जायखेडा (जि. नाशिक) येथे घडला. मात्र, अनेक प्रयत्न करूनही तिजोरीतील रोकड लांबवण्याचा चोरट्यांचा प्रयत्न मात्र सुदैवाने फसला.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जायखेडा येथील मुख्य बाजारपेठेत शाखा आहे. या बँकेत जवळपास दोन लाखांची रोकड होती. त्यात वीजबिल भरणा आणि इतर वसुलीच्या रकमेचा समावेश होता. चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री बँकेचे मुख्य शटर फोडले. इतर साहित्याची तोडफोड केली. मात्र, त्यांना बँकेची तिजोरी काही केल्या फोडायला जमली नाही. त्यामुळे ही रक्कम वाचली. दुसरीकडे या शाखेतील सीसीटीव्ही यंत्रणा आणि अलार्म बंद असल्याचे समोर आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, चोरीच्या अशा घटना रोखल्या जाव्यात म्हणून बँकेने सीसीटीव्ही यंत्रणा दुरुस्त करून घ्यावी, बंद पडलेला अलार्म सुरू करावा आणि येथे एक सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी होत आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -