घरताज्या घडामोडीसमृद्धी महामार्गावर 'इतका' असेल टोल; वाचा सविस्तर

समृद्धी महामार्गावर ‘इतका’ असेल टोल; वाचा सविस्तर

Subscribe

मुंबई-नागपूरकरांसाठी महत्वाचा असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. शिर्डी-नागपूर या पहिल्या टप्प्यातील प्रवास सुरू झाला आहे. हा पहिला टप्पा ५२० किमीचा असून, या प्रवासादरम्यान १८ टोलनाके लागणार आहेत.

मुंबई-नागपूरकरांसाठी महत्वाचा असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. शिर्डी-नागपूर या पहिल्या टप्प्यातील प्रवास सुरू झाला आहे. हा पहिला टप्पा ५२० किमीचा असून, या प्रवासादरम्यान १८ टोलनाके लागणार आहेत. दरम्यान, या टोलनाक्यांवरील टोलची यादी जाहीर झाली. त्यानुसार, हलक्या वाहनांना (कार) ८९९ रुपये तर अति अवजड वाहनांना ५,८०९ रुपये टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्वाची बातमी आहे. (Samruddhi Highway Toll Rate toll Plazas on the Shirdi Nagpur route)

या महामार्गावरील टोलच्या परिपत्रकानुसार, ११ डिसेंबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंतचे (पहिली तीन वर्षे) दर आणि त्यानंतर पुढील प्रत्येक तीन वर्षांनी दरात करण्यात येणारी वाढ देण्यात आली. तसेच, दहा वर्षांपर्यंतचे दर निश्चित करण्यात आले आहेत. चार टप्प्यांतील टोलवाढीचा अखेरचा टप्पा हा १ एप्रिल २०३१ ते १० डिसेंबर २०३२ पर्यंतचा असेल.

- Advertisement -

या वाहनांची टोलमधून मुक्तता

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश, राज्यपाल, उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लोकसभा सभापती, राज्यसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश, न्यायाधीश, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, राज्य दौऱ्यावरील परदेशी मान्यवर, लष्कराची वाहने, केंद्र आणि राज्य सशस्त्र सेना दलाची, पोलिसांची वाहने, रुग्णवाहिका, या वाहनांची टोलमधून मुक्तता करण्यात आली आहे.

- Advertisement -

नागपूर ते शिर्डी टोल पहिल्या टप्प्यातील टोल

  • अंतर : ५२० किमी
  • वाहनाचा प्रकार : मोटार, जीप, व्हॅन, हलके वाहन
  • टोलची किमान रक्कम : ८९९ रु.
  • बस किंवा ट्रक(दोन एक्सल) : ३,०४२ रु.
  • अति अवजड वाहन ५,८०८ रु.

मुंबई-नागपूर प्रवासासाठी टोल

  • अंतर ७०१ किमी
  • मोटार, जीप, व्हॅन, हलके वाहन – सुमारे १,२१२ रु.
  • बस किंवा ट्रक(दोन एक्सल) – सुमारे ४,१०० रु.
  • अति अवजड वाहने – सुमारे ७,८३१ रु.

येथे ठिकाणी आहेत टोल नाके

  • वायफळ
  • सेलडोह वडगाव बक्षी
  • येळकेली, विरूल
  • धामणगाव (आसेगाव)
  • गावनेर तळेगाव (शिवनी)
  • कारंजा लाड
  • शेलू बाजार/ वनोजा
  • मालेगाव
  • मेहकर
  • दुसरबीड
  • सिंदखेडराजा
  • निधोणा
  • सावंगी
  • माळीवाडा
  • हडस पिंपळगाव
  • घायगाव-जांबरगाव
  • कोकमठान

समृद्धी महामार्गावरील टोलचे दर

वाहनांचा प्रकार                                          २०२२           २०२५             २०२८            २०३१
मोटार, जीप, व्हॅन, हलकी मोटार वाहने               १.७३ रु.        २.०६रु.         २.४५रु.          २.९२रु.
मालवाहतुकीची, व्यावसायिक वाहने, मिनी बस       २.७९ रु.        ३.३२रु.         ३.९६रु.           ४.७१रु.
बस अथवा ट्रक (२ आसांची)                          ५.८५ रु.        ६.९७रु.         ८.३०रु.           ९.८८रु.
तीन आसांची व्यावसायिक वाहने                       ६.३८ रु.        ७.६०रु          ९.०५रु.           १०.७८रु.
अवजड बांधकाम यंत्रसामग्री वाहने                    ९.१८ रु.         १०.९३रु.        १३.०२रु.          १५.५१रु.
अति अवजड वाह                                      ११. १७रु.        १३.३०रु.        १५.८४रु.         १८.८७रु.


हेही वाचा – नागपूरचे अधिवेशन किमान तीन आठवडे करा; अजित पवार यांची मागणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -